मुंबई – बॉलिवूडमध्ये ठाकरे घराण्यातील नवं तेजस्वी नाव मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू ऐश्वर्य ठाकरे (Aaishvary Thackeray)
‘निशानची’ (Nishaanchi) या सिनेमातून दणक्यात पदार्पण करत आहे.
अनुराग कश्यप दिग्दर्शित या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून,
ऐश्वर्य या चित्रपटात डबल रोल करताना दिसणार आहे.
देशी मसाल्याचा तडाखेबाज ट्रेलर
‘निशानची’चा ट्रेलर प्रेक्षकांना थेट 2000 च्या दशकाच्या उत्तर प्रदेशातील छोट्या शहरांच्या गजबजाटात घेऊन जातो.
येथे बबलू आणि डबलू या जुळ्या भावांची कहाणी उलगडते – दोन भाऊ पण पूर्णपणे वेगळ्या स्वभावाचे.
ट्रेलरमध्ये थक्क करणारे सीन्स, रोमान्सचे कोमल क्षण,
खुसखुशीत विनोद आणि शिट्टी-मार संवादांचा भरगच्च मसाला आहे.
दमदार स्टारकास्ट
या सिनेमात ऐश्वर्य ठाकरेसोबत वेदिका पिंटो, मोनिका पंवार,
मोहम्मद झिशान अय्यूब आणि कुमुद मिश्रा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
अजय राय आणि रंजन सिंह (जार पिक्चर्स) यांनी निर्मिती केली असून,
फ्लिप फिल्म्सचे सहकार्य आहे. कथा प्रसून मिश्रा, रंजन चंदेल आणि अनुराग कश्यप यांनी लिहिली आहे.
दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणाले…
“अमेझॉन एमजीएम स्टुडिओजसोबत काम करणं फलदायी ठरलं.
ऐश्वर्यसह संपूर्ण कलाकारांनी पात्रांशी जगलं. प्रत्येकाने अभिनयापलीकडे जाऊन सिनेमाला आत्मा दिला.
त्यातलं संगीतही कथेत नवा रंग भरतं. प्रेक्षकांना हा सिनेमा निश्चित आवडेल,” असं कश्यप म्हणाले.
प्रदर्शित होण्याची तारीख
‘निशानची’ हा भव्य देशी मसालापट १९ सप्टेंबरला संपूर्ण देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Read also :https://ajinkyabharat.com/amit-mishrane-sarva-tyapachya-cricketla-dila-nirop/