पावसाळ्यात व उन्हाळ्यात नागरिकांना उभे राहावे लागते; प्रशासनाचे लक्ष वेधले
अजिंक्य भारत प्रतिनिधी – जानोरी मेळ
निंबा अंदुरा सर्कलमधील रोडटच गावांमध्ये प्रवासी निवाऱ्यांची दयनीय अवस्था असून, काही ठिकाणी तर ते पूर्णतः नाहीसे झाले आहेत.
मोखा, जानोरीमेळ, वझेगाव, स्वरूपखेळ या गावांतील प्रवाशांना पावसात आणि उन्हात उभे राहून प्रवासाची वाट पाहावी लागते.
विशेषतः जानोरीमेळ-वझेगाव फाटा हा चार गावांच्या संगमस्थळी असून, येथे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.
याठिकाणी पूर्वी प्रवासी निवारा होता, मात्र त्याची मोडकळ आली असून आता तो अस्तित्वात नाही. लक्ष्मणराव तायडे यांच्या कार्यकाळात हा निवारा उभारण्यात आला होता.
मोखा ग्रामपंचायतीने यापूर्वीच निवेदनाद्वारे प्रवासी निवाऱ्याची मागणी केली होती, मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले.
नुकतीच बाळापूर तालुका अध्यक्ष किशोर कुचके यांनी स्थळ पाहणी केली असून, खासदार निधीतून येथे मोठे शेड मंजूर करून घेण्याचे आश्वासन दिले आहे.
स्थानिक नागरिकांनी हे आश्वासन तातडीने पूर्ण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच वझेगाव फाटा व मोखा फाट्यावर प्रवासी निवारे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही होत आहे.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/jai-bajrang-vidyalaya-green-weekend-plantation/