ग्रेटर नोएडा : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर देशाला हादरवून टाकणारं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे.
हुंड्याच्या लोभासाठी सासरकडच्यांनी निक्की ऊर्फ नक्कीला जिवंत जाळलं. तिच्या सहा वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी आईला जळताना पाहिलं.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट पसरली आहे.
पतीला अटक, पोलिसांसोबत चकमक
या प्रकरणातील मुख्य आरोपी व निक्कीचा पती विपिनला पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये जखमी करत अटक केली.
रविवारी पोलिस त्याला थिनरची बाटली खरेदी केलेल्या ठिकाणी चौकशीसाठी घेऊन जात होते.
त्याचवेळी विपिनने पोलिसांची पिस्तुल हिसकावून पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याच्या पायाला गोळी लागली.
सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे.
निक्कीची शेवटची झुंज
निक्कीला मारहाण करून, तिचे केस पकडून घराबाहेर ओढत नेण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दुसऱ्या व्हिडिओत निक्कीला जाळल्यानंतर ती लंगडत शिड्यांवरून खाली उतरताना दिसतेय.
निक्कीच्या सहा वर्षांच्या मुलाने थरारक सत्य सांगितलं :
“माझ्या आईच्या अंगावर काहीतरी टाकलं, तिच्या कानाखाली मारली आणि लायटर लावून पेटवली.”
आरोपीला पश्चाताप नाही!
पोलिसांनी पकडल्यानंतरही विपिनने धक्कादायक विधान केलं. तो म्हणाला –
“मी तिला मारलं नाही, ती स्वतःच मरण पावली. पती-पत्नीमध्ये भांडणं होत असतात, हे सामान्य आहे.”
निक्कीच्या वडिलांचा संताप
निक्कीच्या वडिलांनी पोलिस कारवाईचे समर्थन करत म्हटलं की, “गुन्हेगार पळायचा प्रयत्न करताच पोलिसांनी योग्य ती कारवाई केली.
पण इतर आरोपींनाही पकडून कठोर शिक्षा करावी,” अशी आमची मागणी आहे.
सासू-नवऱ्याची अत्याचारकथा
ग्रामस्थांच्या मते, विपिन दारु पिऊन घरी येऊन निक्कीला मारायचा. विरोध केल्यावर आई-मुलगा मिळून तिच्यावर अत्याचार करायचे.
अखेर 21 ऑगस्ट रोजी विपिन आणि त्याच्या आईने मिळून निक्कीवर पेट्रोल टाकून तिला जिवंत पेटवून दिलं.
या धक्कादायक प्रकरणामुळे हुंडाबळीविरोधात पुन्हा संतापाची लाट उसळली आहे. समाजातील सर्व स्तरातून आरोपींवर
कठोर कारवाईची मागणी होत आहे.
Read also :https://ajinkyabharat.com/cheteshwar-pujara-retired-enthusiast-post-lit-crickela-dila-nirop/