Bhiwandi Crime – महाराष्ट्राला हादरवणारी धक्कादायक घटना भिवंडीमध्ये उघडकीस आली आहे. येथे एका नवऱ्याने आपल्या पत्नीचा निर्घृण खून करून तिचे शरीर तब्बल 17 तुकडे केले आहे. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.भिवंडीतल्या भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांनी माहिती दिली की, मृत महिलेचे नाव शबाना (नाव बदलले आहे) मोहम्मद तारा अंसारी असून आरोपी नवऱ्याचे नाव ताहा आहे.
घटना कशी उघडकीस आली?
शबानाची आई काही दिवसांपासून तिच्या मुलीचा फोन बंद असल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. तसेच आरोपी नवऱ्याचा फोनही उचलत नसल्याची माहिती मिळाली. 30 ऑगस्ट रोजी इदगाह रोडजवळील कत्तलखान्याच्या परिसरात शबानाचा शीर नसलेला मृतदेह आढळला. या मृतदेहाच्या फोटोवरून पोलिसांना हत्येचा संशय आला आणि ताहापर्यंत पोहोचले. चौकशीदरम्यान ताहाने संशयास्पद उत्तरं दिल्याने त्याला अटक करण्यात आली.सध्या शबानाच्या शरीराचे उरलेले तुकडे शोधण्यासाठी पोलिसांनी ड्रोन आणि अग्निशमन दलाची मदत घेतली आहे. पोलिस तपासात हेही समोर आले आहे की, हत्या कुठे झाली, आणि शरीराचे तुकडे कुठे ठेवले आहेत, या सर्व गोष्टींचा शोध सुरू आहे.
पोलीस तपास सुरू:
आरोपी ताहा अटक, चौकशी सुरू
शबानाच्या शरीराचे इतर तुकडे शोधले जात आहेत
स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दल संयुक्तपणे शोधकार्य करत आहेत
भिवंडीतील ही घटना पती-पत्नीच्या नात्याचे भयानक रूप उघड करत असून, महाराष्ट्रात जनतेमध्ये मोठा संताप निर्माण झाला आहे.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/wife-asha-gavikichi-bhavuk-post-vahiral/