नवीन बस स्थानक टी पॉइंटवर अपघाताचा थरार;

नवीन बस स्थानक टी पॉइंटवर अपघाताचा थरार;

अकोला –

शहरातील नवीन एसटी बस स्थानक चौकात आज दुपारी एक धक्कादायक प्रकार घडला.

बस टी पॉइंट जवळून अशोक वाटिकेकडे जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी

Related News

बसच्या मागील बाजूस एक वृद्ध व्यक्ती धडकला, आणि तो किरकोळ जखमी झाला.

अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

जखमी वृद्धाला तत्काळ मदत करून खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

घटनेमुळे काही वेळ परिसरात अफरातफरीचे वातावरण निर्माण झाले होते.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी खाजगी ऑटोचालकांची गर्दी,

अनियमित वाहतूक आणि याआधी घडलेले अपघात लक्षात घेता बस

चालकांनी अधिक सावधगिरीने वाहन चालवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

या अपघातामुळे वाहनचालकांनीही वाहन सावधगिरीने चालवावं,

हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

टी पॉईंट परिसर वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक बनत चालला असून,

वाहतूक नियंत्रण आणि रचना सुधारण्याची गरज स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/shivaramadhyay-jangi-zero-savali-day-saint-thoughtful/

Related News