गणपती विसर्जनाच्या दिवशीच ‘जिओ’चे सकाळपासून नेटवर्क गायब, युजर्स हैराण

गणपती विसर्जनाच्या दिवशीच सकाळपासून मुंबईत

जिओचे सर्व्हर डाऊन झाले आहे. जिओ मोबाईलचे

नेटवर्क डाऊन झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर

Related News

याबाबत आपल्या व्यथा मांडल्या. जिओच्या नेटवर्कवरुन

कॉल, मेसेज कोणत्याही प्रकारची सेवा सुरु नाही. याशिवाय,

जिओचे इंटरनेटही डाऊन झाले आहे. त्यामुळे जिओचे युजर्स

अडचणीत सापडले आहेत. हा बिघाड दुरुस्त होण्यासाठी किती

वेळ लागणार, याबाबत जिओकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण

देण्यात आलेले नाही. सध्या सोशल मीडियावर #Jiodown हा

हॅशटॅग ट्रेंड होत आहे. Reliance Jio चं नेटवर्क गेल्या 1

तासापासून डाऊन आहे. त्यामुळे Jio युजर्सची अनेक कामं

रखडली आहेत. एका युजरने एक्सवर पोस्ट करत माहिती दिली

आहे की, IDC (डेटा सेंटर) मध्ये लागलेल्या आगीमुळे जिओ सेवा

बंद झाली आहे. येथे दुरुस्तीचं काम सुरु आहे. लवकरच नेटवर्क

सुरळित होईल. मात्र अद्याप Reliance Jio ने याबाबत

कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे युजर्स नेटवर्क

कधी सुरळित होणार याबाबत विचारणा करत आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/delhi-aap-leader-and-minister-atishi-will-take-oath-as-chief-minister/

Related News