देशात गेल्या काही महिन्यांपासून परिक्षांमधील होणाऱ्या घोळामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे.
एकीकडे तलाठी आणि नोकर भरतीच्या परीक्षांमध्ये पेपर फुटीच्या घटना समोर आल्यानंतर
Related News
आता युजीसी नेट आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षांसाठीच्या नीट परीक्षांचेही पेपर फुटल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
देशभरात गदारोळ माजवणाऱ्या याच नीट पेपरफुटीचं लातूर कनेक्शन
आता थेट सोलापूर जिल्ह्यातील माढ्यापर्यंत पोहोचलं आहे.
याप्रकरणी दोन शिक्षकांना दहशतवादविरोधी पथकाच्या पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
त्यापैकी, अटक केलेल्या संजय जाधव यास न्यायालयात हजर केले असता,
न्यायालयाने त्यास 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने संजय जाधवला 6 दिवसांसाठी पोलिसांच्या कोठडीत पाठवलं आहे.
वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट’ प्रकरणात आरोपी संजय जाधव हा
सोलापुरातील माढ्याच्या प्राथमिक शाळेत गेल्या वर्षभरापासून उपशिक्षकाचं काम करत होता.
जिल्हा परिषद शाळेत असणाऱ्या उपशिक्षकाचं नाव
नीट परीक्षा कनेक्शनमध्ये आल्यानं माढा तालुक्याच्याच नव्हे
तर सोलापूर जिल्ह्याच्या शिक्षण विभागातही खळबळ माजली आहे.
याप्रकरणी आरोपी संजय जाधव यास सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या घटनेत आरोपी संजय जाधव हा दिल्ली आणि लातूरमधील दुवा होता.
राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाचे
धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचले आहेत.
या प्रकरणात 4 लोकांविरोधात लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
यातील जलील खान पठाण याला यापूर्वीच अटक करण्यात आली होती.
यातील फरारी संजय जाधव यास काल अटक करण्यात आली.
संजयला आज लातूर येथील न्यायालयात हजर आले असता
त्यास 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/mahavikas-aghadis-jagavatap-formula-fixed-for-legislative-assembly/