अकोला : जुने मुदतबाह्य कीटकनाशके नवीन बॉटलमध्ये भरून विक्री करण्याचा गोरखधंद्यावर कृषी
विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून संबंधित कंपनीवर कारवाई करण्यात आली आहे.
या छाप्यात 21 लाख 95 हजार 280 रुपये किंमतीचा मुदतबाह्य साठा विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अकोला स्थित व्ही. जे. क्रॉप सायन्सस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या कीटकनाशके उत्पादक कंपनीच्या गोडाऊन मध्ये जुने
मुदतबाह्य कीटकनाशकांच्या बॉटल फोडून त्यामधील कीटकनाशक नवीन बॉटल मध्ये टाकणे,
त्याचेे वजन करणे व त्यावर नवीन बॅच क्रमांक व उत्पादन दिनांक असलेले स्टिकर लावणे सुरू असल्याची गुप्त माहिती कृषी विभागाच्या भरारी पथकाला मिळाली.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांच्या उपस्थितीत अकोला जिल्हा भरारी पथक प्रमुख तथा जिल्हा परिषदेचे कृषी विकास
अधिकारी डॉ. तुषार जाधव, भरारी पथक सदस्य जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सतीश दांडगे, कृषी अधिकारी (गुणनियंत्रण)
सुधाकर खंडारे, राहुल सिरसाठ, कैलास राठोड, गौरव राऊत यांच्या पथकाने सदर गोडाऊनवर धाड टाकली.
सदर कंपनीचे कर्मचारी व मजूर यांच्या मार्फत जुन्या मुदत बाह्य कीटकनाशके बॉटल फोडून त्यामधील कीटकनाशक नवीन बॉटल मध्ये टाकणे,
त्याचे वजन करणे व त्यावर नवीन बॅच क्रमांक व उत््पादन दिनांक असलेले स्टिकर लावणे हे कामकाज सुरू आहेत .
या प्रकरणात कीटकनाशके कायदा 1968 व नियम 1971 नुसार उत्पादन स्थळी उपलब्ध मुदतबाह्य साठा
रक्कम रु. 21,95,280 इतक्या साठ्यास विक्री बंद आदेश देण्यात आला असून उत््पादन स्थळावरून 8 कीटकनाशके नमुने घेण्यात आले आहेत.
या प्रकरणात कृषी अधिकारी सुधाकर खंडारे यांनी पोलिस स्टेशन अकोला येथे तक्रार दाखल केली .
असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.