मुंबई महाग असल्याची ख्याती असली तरी शहरात अनेक परवडणाऱ्या बाजारपेठा आहेत जिथे कमी खर्चात मोठ्या प्रमाणात खरेदी करता येते. नवरात्रीसोबतच दिवाळी आणि इतर सण जवळ येत आहेत, त्यामुळे प्रत्येकजण खास लूकसाठी आणि खरेदीसाठी उत्सुक असतो.
लोखंडवाला मार्केट:लोखंडवाला मार्केटमध्ये कपडे, फुटवेअर, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर वस्तू कमी किमतीत खरेदी करता येतात. येथे बार्गेनिंगची संधी असून स्ट्रीट फूडचा अनुभवही घेता येतो.
हिल रोड, वांद्रे:स्थानिकांमध्ये आवडते हिल रोड मार्केट ट्रेंडी कपडे व अॅक्सेसरीज परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करतो. मुलांचे कपडे व फुटवेअर खरेदीसाठी उत्तम पर्याय येथे मिळतात.
फॅशन स्ट्रीट:विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय, येथे प्रत्येक फॅशन ट्रेंडसाठी कपडे आणि अॅक्सेसरीज परवडणाऱ्या किमतीत मिळतात. अनेक ब्रँड्सच्या फर्स्ट कॉपीसुद्धा येथे उपलब्ध आहेत.
लिंकिंग रोडमुंबईतील सर्वात स्वस्त बाजारपेठांपैकी एक. कपडे, फुटवेअर, दागिने व इतर वस्तू येथे खरेदी करता येतात. मात्र, बहुतेक वस्तू ओरिजिनल ब्रँडच्या कॉपी असतात.
कोलाबा कॉजवे:दक्षिण मुंबईतील लोकप्रिय ठिकाण. मुलींसाठी खास, येथे कपडे, अॅक्सेसरीज, दर्जेदार फुटवेअर व विविध प्रकारच्या अन्नाचा अनुभव घेता येतो.
