मोताळा – तालुक्यातील तारापूर हे केवळ निसर्गरम्य नव्हे तर ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाचे स्थळ मानले जाते. राजा हरिश्चंद्र आणि राणी तारामती यांनी स्थापन केलेले अंबादेवीचे मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान असून, नवरात्रोत्सवाच्या काळात येथे हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. या प्राचीन मंदिराचा इतिहास, धार्मिक आख्यायिका आणि निसर्गसंपन्न परिसर भाविकांना अपूर्व आध्यात्मिक समाधान देतो.
राजा हरिश्चंद्र आणि केली अंबादेवीची स्थापना..
हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आणि विशेष म्हणजे राजा हरिश्चंद्र यांनी स्थापित केल्याचा इतिहास असलेल्या बुलढाणा तालुक्यातील तारापूरची अंबादेवी भक्तांच्या हाकेला धावून येत असल्याने नवरात्रोत्सवात या संस्थानावर भाविकांची मंदीयाळी आहे. बुलढाणा तालुक्यातील तारापूर येथील प्राचीन हेमाडपंथी अंबादेवीचे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेला मंदिराचा परिसर अद्भुत शांतीचा अनुभव देतो. नवरात्रात येथे मोठी यात्रा भरते. देवीच्या भक्तांना या परिसर दुमदुमून जातो.
प्राचीन काळापासून येथे हेमाडपंती मंदिर अस्तित्वात होते. या मंदिराच्या औषधे ते पडलेले आढळून आले आहेत. दगडावर कोरीव काम, असलेले स्तंभ आणि देवी-देठतांच्या मूर्ती, मंदिराचे तुटलेले अवशेष तिथे आढळून आले. काही वर्षांपूर्वी या मंदिराचा जिर्णोद्धार करून त्याच ठिकाणी नवीन मंदिर उभारण्यात आले. जुन्या मंदिराचे बरेच अवशेष जमिनीत गडप झाले आहेत. शेकडो वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम काही वर्षांपूर्वी बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांनी हाती घेतले आणि ते पूर्णत्वास गेले आहे. चांडक हे भाविक भक्तांच्या सोयीसुविधांसाठी नेहमीच अग्रेसर असतात.
अंबादेवीच्या मंदिराजवळून विश्वगंगा नदी वाहते. मंदिराच्या चौफेर पर्वतरांगा असल्याने येथील विलोभनीय सौंदर्य डोळ्यात स्थिरावणारे आहे. नवरात्रोत्सवात नऊ दिवस येथे मोठी जत्रा भरते. नवसाला पावणारी अंबादेवी म्हणून ख्याती असल्याने येथे माहेरी आलेल्या लेकी निश्चितच अंबादेवीच्या दर्शनाला येतात. अंबादेवी संस्थान महाप्रसाद वितरित केला जातो. करण्याची भाकर आणि हिरव्या मिरच्यांचा ठेचा असा अंबादेवीला नैवेद्य दाखविण्याचा मान असल्याने हा महाप्रसाद भाविक नऊ दिवस ग्रहण करतात.
सत्वहरण्यासाठी आलेली रंभा – झाली अंबादेवी…
राजा हरिश्चंद्र तारापूर या परिसरात वास्तव्यास होते. त्यांची देवीवर नितांत श्रद्धा होती. रोज सोने दान करीत, त्यामुळे हरिश्चंद्र राजा यांचे पुण्य वाढत होते. हे पाहून इंद्रदेव घाबरले, त्यांनी राजा हरिश्चंद्र यांच्या सत्वहरणासाठी रंभा या अप्सरेला पाठविले. रंभा हिने अनेक मार्गाने कपट रचले. यामध्ये राजा हरिश्चंद्र यांचा रोहिदास हा पुत्र मरण पावला. परंतु रंभा राजा हरिश्चंद्राचे सत्वहरण करू शकली नाही. शेवटी ती हरली. तिला पश्चाताप झाला आणि तिला देवीचे रूप प्राप्त झाले. तीच रंभा आजची अंबादेवी असल्याचा इतिहास सांगितल्या जातो.
शिवाय राजा हरिश्चंद्र यांची पत्नी राणी तारामती यांच्या नावावरून या गावाला तारापूर तर पुत्र रोहिदास याच्या नावावरून बाजूलाच असलेल्या रोहीनखेड गावाचे नाव पडल्याचेही सांगितले जाते.
संपूर्ण भारतात केवळ दोनच मंदिरे….
संपूर्ण भारतात राजा हरिश्चंद्र व राणी तारामती यांनी स्थापन केलेले मंदिर केवळ दोन ठिकाणीच असल्याचा दावा केला जातो. एक मध्यप्रदेशातील उज्जैन येथे तर दुसरे महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील तारापूर येथे मंदिर स्थापित आहे. येथे भाविक मोठ्या संख्येने नतमस्तक होतात.
दोन्ही मंदिर हेमाडपंती असून मंदिरावरील कोरीव नक्षीकाम पाहणाऱ्यांचे मन मोहून टाकते. या मंदिराला इतिहासाची किनार आहे. राजा हरिश्चंद्र यांच्या स्वप्नात महर्षी विश्वामित्र आले. महर्षींनी त्यांना वनवास स्वीकारण्याचे वचन दिले. वचनपूर्तीसाठी राजा यांनी राणी तारामती व पुत्र रोहिदास यांच्यासह काही काळ तारापूर येथे वास्तव्य केल्याचे सांगितले जाते.
पोलीस बंदोबस्त राहणार तगडा, सीसीटीव्हीची ही करडी नजर
तीन अधिकाऱ्यांसह 10 कर्मचारी 10 होमगार्ड या यात्रेच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे यासह सीसीटीव्ही ची देखील करडी नजर राहणार आहे वाढत्या भाविकांच्या गर्दीत नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक शाखेसह मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अशी माहिती बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन कांबळे यांनी दिली आहे स्वतः कांबळे हे या बंदोबस्तात तैनात राहणार आहे.
भाविकांना पाहण्यासाठी पलढग डॅम ठरतोय आकर्षक…
बुलढाणा जिल्हा हा धार्मिक व नैसर्गिक संपदेने समृद्ध असा जिल्हा आहे. या जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्याच्या निसर्गरम्य परिसरात असलेले तारापूर देवस्थान हे श्रद्धा, अध्यात्म आणि निसर्ग यांचा सुंदर मिलाफ म्हणून ओळखले जाते. परिसरात वाहणाऱ्या स्वच्छ जलधारांचे, हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा व विविध पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे हे ठिकाण पर्यटक व भाविकांचे आकर्षण बनले आहे. दरवर्षी हजारो भाविक या ठिकाणी येऊन देवदर्शनाबरोबरच निसर्गाच्या कुशीत समाधान अनुभवतात. धार्मिक स्थळाबरोबरच हे पर्यटनासाठीही उत्तम ठिकाण ठरत आहे. ज्ञानगंगा अभयारण्य व पलढग डॅम यामुळे या ठिकाणी निसर्ग, अध्यात्म आणि पर्यटनाचा संगम घडतो.
read also:https://ajinkyabharat.com/balapuramadhyay-nave-thanear/
