22 सप्टेंबरपासून नवरात्रीला सुरुवात झाली आहे. देशभर देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कडक व्रत पाळत आहेत.मोदी गेल्या ५०-५५ वर्षांपासून ही परंपरा काटेकोरपणे पाळतात. विशेष म्हणजे परदेश दौऱ्यांवर असतानाही ते हे नियम मोडत नाहीत.नवरात्रीच्या काळात त्यांचा आहार अतिशय साधा असतो. दिवसभर ते फक्त लिंबू पाणी पितात आणि संध्याकाळी काही निवडक फळ खातात. इतकंच नाही तर ते नऊ दिवस एकच फळ निवडतात आणि ते दररोज एकदाच खातात. उदाहरणार्थ, जर पपई ठरवली तर पूर्ण नवरात्री फक्त पपईच खातात.मोदींनी स्वतःच सांगितले होते – “मी नऊ दिवस उपवास करतो आणि या काळात एक फळ निवडतो. त्या फळाशिवाय मी दुसरे काहीही खात नाही.”या काळात मोदी दररोज योगाभ्यासही करतात. त्यांच्या शिस्तबद्ध जीवनशैलीमुळे वय असूनही ते सक्रिय आणि ऊर्जावान राहतात.
read also:https://ajinkyabharat.com/samaj-parivartanchaya-ladhait-mahilani-participation-declaration/
