‘आतली बातमी फुटली’ हा मराठी सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, यामुळे मराठी सिनेसृष्टीत उत्सुकतेचा वातावरण तयार झाले आहे. मोहन आगाशे, रोहिणी हट्टंगडी आणि सिद्धार्थ जाधव यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडत आहे. अनेकांनी स्वप्निल जोशींच्या ‘वाळवी’ सिनेमाची आठवणही या ट्रेलरने दिली आहे.
कथा : थरारक खून सुपारीचा रहस्यभेद
‘आतली बातमी फुटली’ ही कॉमेडी क्राइम चित्रपट असून खूनाची सुपारी आणि त्यामागील रहस्य यावर आधारित आहे. हा चित्रपट नातेसंबंधातील गुंतागुंतीला समजून सांगतो आणि प्रेम, धोका व विश्वासघात यांचे वेगवेगळे पैलू उलगडतो. प्रेक्षकांना एका थरारक व रंगीत प्रवासाला घेऊन जाणार आहे.
प्रमुख कलाकार आणि संगीत
मोहन आगाशे, रोहिणी हट्टंगडी, सिद्धार्थ जाधव यांच्या दमदार अभिनयाने चित्रपटाची उंची वाढवली आहे. त्याशिवाय विजय निकम, भारत गणेशपुरे, आनंदा कारेकर, प्रीतम कागणे, त्रिशा ठोसर यांसारख्या कलाकारांनी सशक्त कामगिरी सादर केली आहे.
संगीताच्या बाबतीतही चित्रपटाची एक वेगळीच ओळख आहे. ‘सखूबाई’, ‘चंद्राची गोष्ट’, ‘जालीम सरकार’, आणि ‘आतली बातमी फुटली’ अशा चार रॅप गाण्यांनी सध्या सोशल मीडियावर चांगलीच धमाल केली आहे. संगीताची जबाबदारी एग्नेल रोमन यांनी सांभाळली असून जावेद अली, सुनिधी चौहान, प्रेमराज सोनाली सोनावणे यांसारखे लोकप्रिय गायकांनी सुरेख स्वर दिले आहेत.
निर्मिती आणि दिग्दर्शन
‘आतली बातमी फुटली’चे दिग्दर्शन विशाल पी. गांधी यांनी केले असून निर्मिती विशाल पी. गांधी व ग्रीष्मा अडवाणी यांच्या संयुक्त पथकाने केली आहे. कथा जैनेश इजरदार यांनी लिहिली असून संवाद लेखन जीवक मुनतोडे व अद्वैत करंबेळकर यांनी केले आहे. संकलन रवी चौहान व छायांकन अमित सुरेश कोडोथ यांनी केले आहे.
प्रेक्षकांसाठी रिलीज तारीख
हा धमाकेदार सिच्युएशनल कॉमेडी क्राइम चित्रपट १९ सप्टेंबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मनोरंजनाच्या या नव्या प्रवासात रंगत भरून प्रेक्षकांच्या मनोरंजनाची हाय हाय केली जाणार आहे.
read also :https://ajinkyabharat.com/ganpati-darshanasathi-gujarat-galelya-mulache-kidnapping/
