नवरा माझा नवसाचा 2 यूएस आणि कॅनडामध्ये होणार प्रदर्शित!

तब्बल 19 वर्षांपूर्वी आलेल्या नवरा माझा नवसाचा या सिनेमाचा

सिक्वेल, नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट मागील महिन्यात

प्रदर्शित झाला. या सिनेमाबाबत गेले अनेक महिने उत्सुकता होती.

Related News

बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची यशस्वी घोडदौड सुरु आहे. या

चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 14.36 कोटींची कमाई केली, तर

दुसऱ्या आठवड्याच्या विकेंडला 4.21 कोटींची कमाई केली.

अशाप्रकारे या चित्रपटाने आतापर्यंत 18.57 कोटींची कमाई केली

आहे. आता हा चित्रपट परदेशात प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

याच्या यूएस आणि कॅनडामधील प्रदर्शनाच्या तारखा समोर आल्या

आहेत. या महिन्यात जवळजवळ संपूर्ण अमेरिकेत हा चित्रपट

प्रदर्शित केला जाणार आहे. अहवालानुसार, ‘नवरा माझा नवसाचा

2’ हा चित्रपट सचिन पिळगावकरने स्वत: निर्मित केला आहे.

साधारण 80 लाखांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या

चित्रपटाने आतापर्यंत कोट्यावधी रुपयांची कमाई केली आहे.

‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटात सचिन पिळगावकर

व्यतिरिक्त, स्वप्निल जोशी, अशोक सराफ, सुप्रिया पिळगावकर,

हेमल इंगळे, सिद्धार्थ जाधव, निर्मिती सावंत, वैभव मांगले या

कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/maharashtra-patichya-pavasacha-mukkam-ajun-kiti-day/

Related News