बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी पोषण आहार महत्त्वाचा -संगीता अढाऊ
देशाचे उज्वल भविष्य असलेल्या बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी त्यांना
पोषण आहार देणे आवश्यक असून, जिल्ह्यात पोषण माह कार्यक्रमाची
Related News
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
यशस्वी अंमलबजावणी करा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष
संगीता अढाऊ यांनी केले. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या झरी बाजार
येथे शुक्रवारी (ता.१३) आयोजित पोषण माह कार्यक्रमात त्या बोलत होत्या,
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य प्रमोदिनी कोल्हे, अकोट
पंचायत समितीच्या सभापती हरिदिनि वाघोडे, गजानन काकड, माजी सदस्य गोपाल कोल्हे,
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, महिला व
बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजश्री कौलखेडे आदी
पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. यावेळी संगीता अढाऊ यांच्या हस्ते
पोषण माह कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. आजचे बालक हे उद्या आपल्या
देशाचे उज्ज्वल भविष्य आहे. त्यामुळे त्यांना नियमित पोषण आहार देऊन त्यांच्या
सुदृढ आरोग्यासाठी आई वडिलांसह शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
झरी बाजारसारख्या अति दुर्गम आदिवासी भागात अति उत्साहात पोषण माह साजरा
केल्याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ यांनी आयोजकांचे कौतुक केले.
यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या असून, या स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांना
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात आदिवासी
बांधवांनी आदिवासी नृत्य सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढविली. ढोलकीच्या तालावर
आदिवासी बांधवांनी आकर्षक पेहराव घालत विविध नृत्य सादर केले.
Read also: https://ajinkyabharat.com/vl-srsam-missile-test-successful-in-odisha/