अकोला – राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रिकरण समितीच्या वतीने आज 19 ऑगस्ट पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले.
शासनाच्या वतीने 14 मार्च 2024 रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचारी ज्यांना दहा वर्षे पूर्ण झाली आहेत अशांचे समायोजन करण्यासंदर्भात जीआर लागू
करण्यात आला पण गेले दीड वर्ष उलटूनही या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे समायोजन शासनाच्या वतीने करण्यात आले नाही.
यासोबतच मानधन वाढ, रॉयल्टी बोनस, ईपीएफ, इन्शुरन्स, बदली धोरण मान्य होत नसल्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन
सुरू केले या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे आरोग्य सेवेवर परिणाम होणार असल्याचे दिसून येते यासंदर्भात डॉ. राम नागे यांनी अजिंक्य भारत न्युज अशी
बोलताना माहिती दिली
Read also : https://ajinkyabharat.com/har-har-mahadevchaya-gajrat-kavad-festival-concluded/