नाशिकच्या जिंदाल कंपनीत सलग तिसऱ्या दिवशीही भीषण आग;

नाशिकच्या जिंदाल कंपनीत सलग तिसऱ्या दिवशीही भीषण आग;

 नाशिक-मुंबई महामार्गालगत असलेल्या जिंदाल कंपनीत लागलेली आग आज सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा धुमसत आहे.

तब्बल 72 तास उलटल्यानंतरही ही आग पूर्णतः आटोक्यात आलेली नसून,

संपूर्ण परिसरात प्रचंड धुराचे काळे लोट आकाशात झेपावत आहेत.

Related News

या आगीत कंपनीतील एक संपूर्ण प्लांट आगीच्या भक्ष्यस्थानी गेला आहे.

30 ते 40 अग्निशमन बंब घटनास्थळी:

नाशिकसह ठाणे, मुंबई, मालेगाव महापालिका आणि अन्य नगरपालिकांमधून ३० ते ४० अग्निशमन गाड्या

आग आटोक्यात आणण्यासाठी पाठवण्यात आल्या आहेत. मात्र, कंपनीमध्ये वापरले जाणारे

पाणी अपुरे पडत असल्याने इतर कंपन्यांकडूनही पाण्याचा पुरवठा मागवला जात आहे.

एलपीजी टाकीचा धोका कायम:

नाशिक महापालिकेचे प्रभारी अग्निशमन अधिकारी प्रदीप बोरसे यांनी माहिती दिली की,

कंपनीच्या परिसरात एलपीजी गॅस टाकी आहे. टाकीचे तापमान वाढू नये म्हणून सतत

पाणी आणि फोमचा मारा करून तापमान नियंत्रित ठेवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

ही टाकी पेटल्यास मोठा स्फोट होऊन गंभीर अनुर्थ घडू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

एनडीआरएफ तुकडीची मागणी:

आग नियंत्रणाबाहेर जात असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शाखेकडून एनडीआरएफ

(राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) तुकडी मागवण्यात आली आहे. पुणे येथील बेस कॅम्पशी संपर्क साधण्यात आला असून,

गुरुवारी पहाटेपर्यंत एनडीआरएफची तुकडी घटनास्थळी दाखल होण्याची शक्यता आहे,

अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे यांनी दिली.

कामगार जखमी, कंपनीत आग लागण्याची दुसरी वेळ:

या दुर्घटनेत दोन कामगार जखमी झाल्याचे कळते. विशेष म्हणजे ही आग जिंदाल कंपनीत लागलेली दुसरी वेळ आहे.

बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास आगीचा भीषण भडका उडाला होता. पॉलिफिल्म तयार करण्यासाठी असलेला

कच्चा माल व रसायनांमुळे आग वेगाने पसरून अनियंत्रित झाली.

सततची आग व अपयशी नियंत्रणामुळे नागरी प्रशासनावरही प्रश्नचिन्ह:

तिसऱ्या दिवसापर्यंत आग आटोक्यात येऊ न शकल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व भीतीचे वातावरण आहे.

जिवितहानी टळली असली तरी पर्यावरण व सार्वजनिक आरोग्यावर याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/dhakkadayak-hadpasaramadhye-22-year-old-married-hundyasathi-chha/

Related News