नाशिक हादरलं! पहिल्या पत्नीकडे जास्त ओढ… दुसऱ्या पत्नीनं भावांसह केला पतीचा खून

दोन विवाह, दोन घरे...

नाशिक – नाशिक जिल्ह्यातील आडगाव-सैयद पिंपरी रोड परिसरात एका महिलेनं

आपल्या दोन भावांच्या मदतीनं पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पती पहिल्या पत्नीसोबत जास्त वेळ घालवत होता,

त्यामुळे रागाच्या भरात दुसऱ्या पत्नीनं हा थरारक प्रकार केल्याचे समोर आलं आहे.

शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेनं परिसर हादरला.

भावसार मूलचंद पवार उर्फ बाला (व्यवसाय – खेळणी विक्री) याने दोन विवाह केले होते.

मात्र तो आपल्या पहिल्या पत्नीबरोबरच जास्त काळ राहत होता.

यामुळे अस्वस्थ झालेल्या दुसऱ्या पत्नी सुनीतानं आपल्या दोन भावांसह मिळून

आधी पतीला बेदम मारहाण केली आणि नंतर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला.

या प्रकरणात सुनीता हिच्यासह तिचे दोन भाऊ राज शिंदे व आदित्य शिंदे,

दीपक आणि आणखी एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भावसारच्या पहिल्या पत्नी निरमा पवार यांनी

पोलिसांत तक्रार नोंदवली असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता आणि भावसार यांच्यात दिवसभर भांडण सुरू होतं.

निसंतान असल्यामुळे भावसार पहिल्या पत्नीकडे अधिक वेळ देत होता.

त्यातून संतप्त झालेल्या सुनीता व तिच्या भावांनी

हा टोकाचा मार्ग अवलंबल्याचं पोलिस तपासात स्पष्ट झालं आहे.

या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पुढील तपास आडगाव पोलिस करत आहेत.

Read also :https://ajinkyabharat.com/slapgate-18-years-juna-vidio-leak-punha-rangli-discussion/