नाशिक: फटाक्याच्या गोडाऊनला भीषण आग

नाशिक

नाशिक येथील शिंदे गावात असलेल्या एका फटाक्याच्या गोडाऊनला

भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग मोठ्या प्रमाणात

असल्याने गोडाऊन मधून धुराचे लोट बाहेर येताना दिसत आहे. पोलीस

Related News

आणि अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या शिंदे गावातील फटाक्याच्या

गोडाऊनला एक ते दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागली.

गोडाऊनमध्ये असलेले फटके एकामागे एक फुटत असल्याने परिसरात

मोठमोठे आवाज येत आहे. तर धुराचे लोट आकाशामध्ये पसरल्याचे पाहायला मिळत आहे.

फटाक्यांचा एक ट्रक गोडाऊनच्या परिसरात आला आणि त्यानंतर काही वेळाने आग

लागल्याचे काही स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र आग नेमकी कशामुळे लागली याचे

कारण अद्याप अस्पष्ट आहे. गोडाऊनमध्ये कोणी अडकले आहेत का?

याबाबतही अद्याप स्पष्टता नसून पोलीस आणि अग्निशामक विभागाच्या कर्मचारी

घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/pune-nagpur-travel-will-be-done-decision-to-add-susat-samriddhi-mahamarg-punyala/

Related News