Nashik Crime : दमदाटी करत अपहरण करून वृद्धाच्या नावावरील जमीन बळकावण्याचा प्रकार नाशिकच्या निफाड तालुक्यातील महाजनपूर येथे घडला आहे.
Nashik Crime : दमदाटी करत अपहरण करून वृद्धाच्या नावावरील जमीन बळकावण्याचा प्रकार नाशिकच्या निफाड (Niphad) तालुक्यातील महाजनपूर येथे घडला आहे.
याबाबत वृद्धाच्या मुलीने चुलत्याच्या विरोधात सायखेडा पोलीस ठाण्यात (Saykheda Police Station) तक्रार केली आहे. यामुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
Related News
याबाबत मंगल ज्ञानेश्वर आव्हाड (32, रा. गुळवंच, ता. सिन्नर) यांनी सायखेडा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझे माहेर महाजनपूर, ता. निफाड येथील असून माझे वडिलांचे नाव पाडुरंग कचरू फड असे आहे.
माझे वडील हे मानसिकदृष्ट्या अपंग आहेत व आईला पण बोलता येत नाही. माझे आई-वडील हे अपंग असल्यामुळे ते माझे चुलत चुलते पंडित भागूजी फड, रा. महाजनपूर यांच्याकडे राहत होते.
तर तुला अन् तुझ्या मुलींना संपवून टाकू
आईचे माहेर हे महाजनपूर येथील असल्याने आई कधी कधी मामा नामदेव कारभारी नागरे यांच्याकडे पण राहत असे.
माझे वडील व सख्खे चुलते खंडू कचरू फड यांच्या नावावर महाजनपूर शिवारात वडिलोपार्जित शेत गट नंबर 137 मधील क्षेत्र 3 हेक्टर 93 आर अशी सामाईक शेतजमीन आहे.
दि.11 मार्च रोजी मी व माझे पती ज्ञानेश्वर गुळवंच येथे असताना मला माझा चुलत भाचा सोनू विलास फड (रा. महाजनपूर) याने सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास कळवले की,
आता थोड्या वेळापूर्वी एक चॉकलेटी रंगाची ओमनी गाडी आली होती व त्या गाडीतून खंडू कचरू फड, गणपत खंडू फड व भेंडाळी येथील राहणारा अन्सार अहमद तांबोळी यांची ओमनी गाडी घेऊन आमचे घरासमोर येऊन, पांडूबाबा फड यांना,
तुझ्या नावावर असलेली जमीन आमच्या नावावर करतो की नाही? नाहीतर तुला व तुझ्या मुलींना जीवे मारून टाकू, असे बोलले.
अपहरण करून जमीन बळकावली
यानंतर पांडुरंग फड हे इकडे-तिकडे पळू लागले असता त्या तिघांनी त्यांना बळजबरीने तांबोळी यांच्या गाडीत टाकून कोठेतरी घेऊन गेले आहे, असे सांगितले.
त्यामुळे मी व पती तातडीने मोटारसायकलवर महाजनपूरला आलो असता चुलत वहिनी संगीता फड हिने सांगितले की, गणपत खंडू फड व खंडू कचरू फड, अन्सार अहमद तांबोळी यांनी पांडू कचरू फड यांची बळजबरीने शर्टाची गच्ची धरून बळजबरीने ओमनी गाडीत बसवून कोठेतरी घेऊन गेले आहे.
संध्याकाळी वडील घरी आल्यावर त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला अंगठा दिल्याचे शाईचे निशाण होते. तेव्हा वडिलांनी त्रोटक आवाजात भाऊ खंडू व पुतण्या रामा यांनी आणलेल्या गाडीत बळजबरीने बसवून घेऊन गेले व तेथे माझा फोटो काढला व अंगठा घेतला आहे असे सांगितले.
सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
तेव्हा आम्ही तात्काळ सब रजिस्टर कार्यालय निफाड येथे जाऊन चौकशी केली असता तेथे आम्हाला समजले की, माझे चुलते व चुलत भाऊ व अन्सार तांबोळी यांनी माझ्या वडिलांच्या वेडसरपणाचा
फायदा घेऊन त्यांची वडिलोपार्जित शेतजमीन आम्हा दोघी बहिणी व आईला न विचारता घरासमोरून बळजबरीने घेऊन जाऊन वडिलांच्या इच्छेविरुद्ध अपहरण केले.
त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देऊन आमचा विश्वासघात करून मालमतेची फेरबदल करण्यासाठी निफाड येथील सबरजिस्टर कार्यालयात वडिलांना नेण्यात आले.
वडिलांच्या वेडसरपणाचा फायदा घेऊन वडिलांकडून विनामोबदला हक्कसोडपत्र करून घेतले आहे. त्यांनी वडिलांना भूमिहीन केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.