नरहरी झिरवाळ यांचा धनगर आरक्षणाला विरोध

विधासभा

विधासभा उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते

नरहरी झिरवाळ यांनी धनगर समाजाला आदिवासी आरक्षणातून

आरक्षण देण्यास विरोध केला आहे. धनगर समाजाला आरक्षण

Related News

देण्यास आमची ना नाही. पण आमच्यामधून त्यांना आरक्षण का?

धनगर समाजाला आदिवासीतूनच आरक्षण देण्याचा हट्ट का?

असा सवाल नरहरी झिरवाळ यांनी केला आहे. मीडियाशी संवाद

साधताना त्यांनी हा सवाल केला आहे. झिरवाळ यांच्या या विरोधा

मुळे आता मराठा-ओबीसी वादानंतर धनगर-आदिवासी वाद निर्माण

होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वर्षानुवर्षे हा विषय सुरू आहे.

धनगर समाजाला आरक्षण द्यावे यावर आमचे दुमत नाही. पण आमच्यातून

देऊ नये. आदिवासी आरक्षण हवे हा हट्ट का? आमच्यात आरक्षण हवे

हा हट्ट योग्य नाही. कालच्या बैठकीची मला कल्पना दिली  नाही, असं

नरहरी झिरवाळ म्हणाले. माझी सरकला विनंती आहे. जसे त्यांना

बोलवले जाते तसं आम्हालाही बोलवलं पाहिजे. आमचे नेते आहेत.

मंत्री आहेत त्यांना बैठकीला बोलावयला हवे होते. मी विधान सभेचा उपाध्यक्ष

असल्याने समाजाचे माझ्याकडे लक्ष आहे. सरकारच्या निर्णया विरोधात

आदिवासी आमदार, नेते, संघटना सर्व एकत्र येतील. सर्व आदिवासी

नेत्यांची बैठक घेऊन पुढील भूमिका स्पष्ट करणार आहे. विरोध करायचा

की न्याय मागायचा हा निर्णय घेतला जाणार आहे, असंही नरहरी झिरवाळ

यांनी स्पष्ट केलं.

Read also: https://ajinkyabharat.com/the-nationalist-claimed-that-the-mahayutt-was-so-awakened/

Related News