टी-20 विश्वचषक 2024 ची स्पर्धा जिंकून टीम इंडिया आज मायदेशी परतली.
यानंतर टीम इंडियाचे सर्व खेळाडू, प्रशिक्षकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांची भेट घेतली.
Related News
‘मोनिका ओ माय डार्लिंग’… ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम;
‘१२वी नापास, पण मोठमोठ्या वेबसाईट्स हॅक करणारे’
नवीन बस स्थानक टी पॉइंटवर अपघाताचा थरार;
शिवरमध्ये जागतिक शून्य सावली दिन संत विचारधनाने साजरा;
अकोल्यात झिरो शॅडो डेचा अनुभव; नागरिक म्हणाले – सावलीच नाहीशी झाली!
२४ मे २०२५ चं हवामान : वीकेंडला मुसळधार पावसाचा इशारा,
ऑपरेशन सिंदूरवरून प्रेरित ‘स्पेशल बनारसी साडी’;
पटना-गया आणि बक्सर दरम्यान लवकरच धावेल ‘नमो भारत एक्सप्रेस’;
“इंग्लंडचा रणसंग्राम! पहिल्याच दिवशी 498 धावा,
“वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि रेड अलर्ट:
“पाकिस्तानच्या ‘पाण्याच्या’ धमकीवर भारताचा संताप;
“आर्यन खान तुरुंगात फक्त फळं आणि पाण्यावर;
टीम इंडिया आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यानचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
यामध्ये नरेंद्र मोदी यांनी विश्वचषक ट्रॉफी आणि सर्व खेळाडूंसह फोटो काढला.
तसेच विश्वचषकातील काही आठवणी नरेंद्र मोदी सांगताना टीम इंडियाचे खेळाडू व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर
सर्व खेळाडू दिल्ली विमानतळावर दाखल झाले.
मुंबईसाठी रवाना होण्यासाठी टीम इंडिया दिल्ली विमानतळावर दाखल झाली आहे.
भारतीय क्रिकेटमध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमचे विशेष स्थान आहे.
याच स्टेडियमवर भारताने 2011 सालचा एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक उंचावला होता.
आता, याच स्टेडियमवर आज भारताच्या टी-20 विश्वविजेत्या संघाचाही सन्मान होणार आहे.
टीम इंडियाचे चार खेळाडू थेट विधानभवनात
सध्या मुंबईत महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे.
यादरम्यान भारतीय संघांचे मुंबईतील खेळाडू रोहित शर्मा,
शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांची उद्या भेट घेणार आहे.
यावेळी विधीमंडळाच्या सभागृहात या खेळाडूंचा खास सत्कार करण्यात येणार आहे.
यासंदर्भात शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आज माहिती दिली.
यासंबंधीचे निमंत्रण या खेळाडूंना देण्यात आलं आहे.
यावेळी सर्व पक्षाचे आमदार उपस्थित रहावे यासाठी
विधानसभा अध्यक्षांकडे विनंती करणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
Read also: https://ajinkyabharat.com/chief-minister-champai-sorens-resignation/