🔹 मुंबई | विशेष प्रतिनिधी
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकामुळे सध्या
राज्याच्या राजकारणात नवा वाद उफाळून आला आहे.
Related News
वानखेडेवर ‘हिटमॅन’चा अभिमान!
“ऑपरेशन सिंदूर”नंतर भारताची तयारी आणखी आक्रमक
“ट्रंप-असीम डील” : पाकिस्तानवरील अमेरिकेची अचानक वाढलेली मेहरबानी का?
राजस्थानात धक्का बसवणारी घटना:
मुस्लिम परंपरेला धक्का देणाऱ्या दृश्यांवर वाद!
India vs Pakistan: युद्धविराम वाढल्यानंतर भारतीय सैन्याची प्रतिक्रिया;
फ्राईड राईसमध्ये रबराचे तुकडे;
Gold-Silver Price Today: १६ मे २०२५ रोजी सोन्या-चांदीच्या दरात घसरण;
“बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना एका ‘लोफर’कडे दिली!”
दिल्ली-एनसीआरमध्ये धुळीच्या वादळानंतर वायू गुणवत्ता खालावली;
“मी मुसलमान आहे, खान्ससारखा गद्दार नाही”
Maharashtra Weather Update : वादळ, पावसाचा धोका!
पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना शरद पवार आणि बाळासाहेब
ठाकरे यांनी मदत केली होती, असा उल्लेख करून राऊतांनी खळबळ उडवून दिली आहे.
या पुस्तकावर भाजपकडून जोरदार प्रतिक्रिया उमटत असून चंद्रशेखर बावनकुळे यांनी राऊतांवर जहरी टीका केली आहे.
“पुस्तकाचं नाव ‘नरकातला स्वर्ग’ न ठेवता ‘नरकातला राऊत’ असं असायला हवं होतं”, असा घणाघात त्यांनी केला.
इतकंच नव्हे, तर “मी संजय राऊतांना पत्र लिहून पुस्तकाचं नाव बदलण्याची मागणी करणार आहे”, असंही बावनकुळे म्हणाले.
यापूर्वी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही राऊतांवर टीका करत “गटारातील अर्क असं नाव त्या लेखकाला शोभेल”,
असं वक्तव्य केलं होतं. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक टोला लगावत म्हटलं होतं की,
“कथा, कादंबऱ्या आणि बालवाड्मय वाचायचं वय माझं आता राहिलेलं नाही.”
राजकीय वर्तुळात संजय राऊतांच्या पुस्तकातील मजकूर आणि त्यावर उमटलेल्या प्रतिक्रिया यामुळे
वातावरण चांगलेच तापले आहे. पुढील राजकीय घडामोडींवर आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/operation-sinduranantar-bharatachi-tayari-anakhi-aggressor/