काठमांडू (Nepal) – नेपाळमध्ये सध्या सामाजिक माध्यमांवरील बंदीविरोधात जेनरेशन झेड (Gen-Z) चा हिंसक निषेध सुरु आहे. सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर, अनेक नागरिक रस्त्यावर उतरले. ही हिंसा आता भीषण रूप धारण करत असून आतापर्यंत 21 लोकांचा मृत्यू झाल्याची आणि 300 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
विद्यार्थी, ज्यांनी शाळा-महाविद्यालयीन गणवेश घालून रस्त्यावर उतरले, त्यांनी बॅनर व पोस्टर घेऊन निषेध करत घोषणाबाजी केली. हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडीत न राहता प्रामुख्याने जनतेच्या आवाजासाठी आणि न्यायाच्या मागणीसाठी चालवले जात आहे. सुरुवातीला अश्रूधुराचा वापर करण्यात आले, परंतु नंतर निषेध हिंसक स्वरूपात रुपांतरित झाला.
अभिनेत्री मनिषा कोईरालाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर रक्ताने माखलेला बुटाचा फोटो पोस्ट करत या घटनेला काळा दिवस असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी लिहिले,
“आज नेपाळसाठी काळा दिवस आहे. जेव्हा जनतेचा आवाज, भ्रष्टाचाराविरुद्ध नाराजी आणि न्यायाची मागणी केली जाते, तेव्हा त्यांना गोळ्यांनी उत्तर दिलं जातं.”
सोशल मीडियावर ही पोस्ट तुफान व्हायरल होत असून अनेकांनी अभिनेत्रीच्या भावना पाठिंबा दर्शवला आहे. नेपाळमधील हिंसाचाराचे काही धक्कादायक व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात शेअर होत आहेत.
नेपाळ सरकारने हिंसाचार थांबवण्यासाठी आणि जनतेच्या आवाजाकडे लक्ष देण्यासाठी त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे. समाजातील शांतताप्रेमी लोक आणि जनतेला न्याय मिळावा हाच उद्देश असलेल्या या आंदोलनाने नेपाळचे सामाजिक वातावरण गंभीरतेने प्रभावित केले आहे.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/jeevana-vatewar-mercury-aspiration/