दूध उत्पादकांना दर वाढवून द्या..
श्वेतक्रांतीमध्ये ज्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे
Related News
‘मोनिका ओ माय डार्लिंग’… ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम;
‘१२वी नापास, पण मोठमोठ्या वेबसाईट्स हॅक करणारे’
नवीन बस स्थानक टी पॉइंटवर अपघाताचा थरार;
शिवरमध्ये जागतिक शून्य सावली दिन संत विचारधनाने साजरा;
अकोल्यात झिरो शॅडो डेचा अनुभव; नागरिक म्हणाले – सावलीच नाहीशी झाली!
२४ मे २०२५ चं हवामान : वीकेंडला मुसळधार पावसाचा इशारा,
ऑपरेशन सिंदूरवरून प्रेरित ‘स्पेशल बनारसी साडी’;
पटना-गया आणि बक्सर दरम्यान लवकरच धावेल ‘नमो भारत एक्सप्रेस’;
“इंग्लंडचा रणसंग्राम! पहिल्याच दिवशी 498 धावा,
“वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि रेड अलर्ट:
“पाकिस्तानच्या ‘पाण्याच्या’ धमकीवर भारताचा संताप;
“आर्यन खान तुरुंगात फक्त फळं आणि पाण्यावर;
त्यांनाच राज्यातील भाजपा-शिंदे सरकार लुटत आहे.
गाई, म्हशींचे खाद्य व त्यांच्यावर होणाऱ्या खर्चात प्रचंड वाढ झाली आहे,
त्याप्रमाणात दूध खरेदी दर मात्र कमी आहेत.
हे दर वाढवून देऊन शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी,
असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की,
महाराष्ट्रातील भाजपा प्रणित सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.
विविध राज्यात शेतकऱ्याच्या दुधाला ४५ रुपयांपर्यंत भाव मिळत आहे;
परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दुधाला फक्त २७ रुपये भाव मिळतो
आणि हेच दूध अमूल व इतर दूध कंपन्यांकडून ग्राहकाला ५५ ते ६० रुपये प्रति लिटर विकले जात आहे.
राज्य सरकारने तातडीने यात लक्ष घालून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूधाचे दर वाढवून द्यावेत
अन्यथा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल,
असा इशारा नाना पटोले यांनी दिला.
काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत तेलंगणातील काँग्रेस सरकारने
शेतकऱ्यांचे सरसकट २ लाख रुपयांचे कर्ज माफ केले आहे.
२७ जूनपासून राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरु होत असून
भाजपा शिंदे सरकारनेही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा या अधिवेशनात करावी,
अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/terrorist-attack-on-russian-church-and-synagogue/