तेल्हारा (अकोला) प्रतिनिधी – बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा नाल्याच्या पुरात वाहून जाऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक
घटना अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण शेतशिवारात घडली आहे.
वैभव मनोज गवारगुरु (वय १७) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
वैभव शेतातून घरी येत असताना अचानक आलेल्या पुरामुळे तो आणि त्याचे काका दुचाकीसह नाल्यातील पाण्यात अडकले.
काका माजी सैनिक असल्याने त्यांनी धाडसाने पोहून आपला जीव वाचवला,
मात्र वैभव पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला. त्यानंतर शोधमोहीम राबवण्यात आली पण दुर्दैवाने त्याचा मृतदेह सापडला.
ही घटना तेल्हारा – उमरखेड मार्गावरील पंचगव्हाण शिवारात घडली.
काही दिवसांपूर्वीच दहिगाव अवताडे येथील एका शेतकऱ्याचा याचप्रकारे पुरात मृत्यू झाला होता.
त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शोकसागरात गाव:
वैभवच्या आकस्मिक निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे. तो अभ्यासात हुशार आणि शांत
स्वभावाचा असल्याने त्याच्या सहाध्यायी आणि शिक्षकवर्ग हळहळ व्यक्त करत आहेत.
प्रशासनाला सवाल:
अनेक नाले, ओढे, आणि पुलांवर सावधतेचे फलक, अडथळे, किंवा सुरक्षा यंत्रणा नसल्याने
वारंवार अशा घटना घडत असल्याची नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/shegavajavil-mana-nadila-pur-akola-buldhana-sampark-tutla/