नाल्याच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; सोयाबीन-कापूस पिके बुडाली

सोयाबीन-कापूस पिके बुडाली

हिरपूर –  सततच्या पावसामुळे नाल्यातून वाहणाऱ्या पाण्याने शेतात शिरकाव

केल्याने गावातील शेतकऱ्यांची पिके बुडाली आहेत.

यात प्रमोद सोळंके आणि संकेत दहीकर या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून,

सोयाबीन आणि कापूस यांसारखी उभी पिके पाण्याखाली आल्यामुळे त्यांची मुळे कुजून गेली आहेत.

सततच्या पावसामुळे नाल्याचे पाणी शेतात शिरले होते .

सोयाबीन आणि कापूस पिकांचे मोठे नुकसान आहे .

शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले या घटनेमुळे

शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्नात मोठा फटका बसला आहे.

प्रशासनाने घटनास्थळी पंचनामा केला असून, नुकसानीची नोंद घेतली आहे.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, “नुकसानीचे प्रमाण इतके मोठे आहे की,

शासनाने तात्काळ मदत न केल्यास पुढील हंगामात पेरणी करणे कठीण होईल.”

ग्रामस्थांनी म्हणून सांगितले की, दरवर्षी नाल्याच्या पाण्यामुळे अशीच परिस्थिती निर्माण होते.

वेळेत नाल्यांची साफसफाई आणि मजबूत बांधकाम केले असते तर हे नुकसान टाळता आले असते.

त्यामुळे शासनाने तातडीने यावर उपाययोजना करावी, अशी त्यांची मागणी आहे.