Nagpur Violance Update : नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतर
आता या प्रकरणात तिसरी मोठी अटक करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
Nagpur Violance Update : उपराजधानी नागपूर (Nagpur) शहरात दोन गटात उसळलेल्या
Related News
हिंसाचार प्रकरणातील (Nagpur Violance) कारवाईसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे.
नुकतेच नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतर
आता या प्रकरणात तिसरी मोठी अटक करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
फैजान खातीबवर जमावाला भडकावल्याचा आरोप
नागपूर हिंसाचार प्रकरणात फैजान खातीब याला हिंसाचाराच्या सुमारे दहा दिवसानंतर पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस सूत्रानुसार फैजान खातीब हा जहाल विचारांचा असून त्याने जमावाला भडकावले असल्याची माहिती पुढे आली आहे.
या प्रकरणाच्या तपासात रोज नवी माहितीप पुढे येत असताना नागपूर पोलिसांनी या प्रकरणात तिसरी मोठी अटक केली आहे.
फैजान खातीब सह आणखी एक आरोपी शहबाझ काझी यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
त्यामुळे अद्याप नागपूर हिंसाचार प्रकरणात पोलिसांकडून आरोपींचे अटकसत्र अजूनही सुरूच असल्याचे बघायला मिळाले आहे.
फैजान खातीब हा अकोल्यामध्ये असतो. मात्र ईद निमित्त महिनाभरापूर्वी तो त्याच्या मूळगावी म्हणजेच नागपुरात आला होता.
17 मार्चला नागपूरला झालेल्या हिंसाचाराचे सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ फुटेच्या माध्यमातून खातीबला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांकडून आरोपींचे अटकसत्र सुरूच!
नागपूर हिंसाचाराचा कथित सूत्रधार फहिम खान आणि मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा
कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनिअर नंतर फैजान खातीब ही या प्रकरणातील तिसरी मोठी अटक मानल्या जात आहे.
यापूर्वी नागपूर पोलिसांनी (Nagpur City Police) सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडियावरील
फूटप्रिंटसच्या आधारे नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी तीन आरोपींना अटक केली होती.
त्यामुळे अटक करण्यात आलेल्या एकूण आरोपींची संख्या 113 वर पोहोचली होती.
आता त्यात आणखी आरोपींची भर पडली आहे.
पंतप्रधानांच्या नागपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क, ‘हेट स्पीच’वरही नजर
नागपुरात नुकतच उसळलेला हिंसाचार आणि त्या पार्श्वभूमीवर नागपुरात होत
असलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा हे पाहता, पोलिसांच्या सायबर सेलने सोशल मीडियावर विशेष लक्ष ठेवणे सुरू केले आहे…
कोणत्याही प्रकारच्या “हेट स्पीच”वर नजर ठेवण्यासाठी नागपूर सायबर सेल ने विशेष टीम तयार केली
असून पंतप्रधान यांच्या दौऱ्या दरम्यान सोशल मीडिया वर अफवाह पसरविणारे,
हेट स्पीच संदर्भात व्हिडिओ पोस्ट करणारे किंवा त्यांना फॉरवर्ड करणाऱ्यावर कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली
जाईल असा इशाराच सायबर सेल ने दिला आहे..
त्यामुळे कायद्याच्या अजाणतेमुळे सोशल मिडिया वर काही ही पोस्ट करण्यापूर्वी विचार करा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.