वस्तीचे नाव बदलल्यामुळे घरकुल लाभापासून वंचित
15 ऑगस्ट पासून आंदोलनाचा इशारा
केंद्र सरकार व राज्य सरकारच्या नियमानुसार मांगेल त्याला घर देण्याचे आदेश पारित केले
व बेघर लोकाना सरकारी जागा देऊन घरे देण्याचे ठरविले परंतू बाळापूर नगर परिषद त्याला अपवाद ठरत आहे.
गेल्या २०२४ ला नविन कर आकारनीसाठी बाळापूरातिल वस्ती मध्ये सर्वे करण्यात आला.
त्यानंतर नागरिकांनी घर कर पावती काढल्या तर गाजीपुर येथील नागरिकांच्या पावती वर गाजीपूर ऐवजी सतरंजीपुरा शहर व इस्लामपुरा शहर असे
लिहू आल्याने नागरिकांन मध्ये तारबंळ उडाली. नागरिकानी नगर परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या कडे
तक्रार सुद्धा केली परंतू कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही
एवढेच नव्हे तर नाव सुद्धा बदलून देण्यात आले नाही.
घरकुला करिता लागणारे दस्ताऐवज मध्ये आठ अ महत्त्वाचा असतो त्याच आठ अ वर वस्तीचे नाव बदल्याने लोकांना घरकुलाचा लाभ मिळणे अशक्य झाले
व काही नियमा कुल मध्ये अडचणी येत असल्यामुळे घरकुल मिळत नाही ही बाब पाहता येथील नागरिकांनी निवेदन देत न्यायाची मागणी केली.
जर आम्हाला १३ ऑगस्ट पर्यंत न्याय नाही मिळाला तर गाजीपूर वाशी यांनी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापासून आंदोलनाचा इशारा दिला आहे.