नागा चैतन्यने शोभिता धुलिपालाशी केला साखरपुडा

नागा चैतन्य

दाक्षिणात्य सुपरस्टार नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला यांचा

साखरपुडा पार पडला आहे. हा साखरपुडा नागार्जुन यांच्या घरी पार पडला.

नागार्जुन यांनी मुलाच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत.

Related News

या सोबतच नागार्जुन यांनी एक नोट लिहली आहे.  फोटो शेअर करताना

नागार्जुन यांनी म्हटले की, आम्हाला आमचा मुलगा, नागा चैतन्य, शोभिता धुलीपाला

यांचा आज सकाळी 9.42 वाजता साखरपुडा झाल्याची घोषणा करताना आनंद होत आहे.

चाहत्यांनी या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

नागा चैतन्यचे वडील नागार्जुन यांनी एक्सवर फोटो पोस्ट करून

मुलाच्या साखरपुड्याची माहिती दिली. त्यांच्या हैदराबादमधील घरीच

साखरपुड्याचा समारंभ पार पडला. नागार्जुन यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये

शोभिता व नागा चैतन्य दोघेही खूपच सुंदर दिसत आहेत. या फोटोंवर कमेंट करून

चाहते चैतन्य व सोभिताला शुभेच्छा देत आहेत. चैतन्य व सोभिता काही वर्षांपासून डेटिंग करत होते.

2015 मध्ये, शोभिताने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात अनुराग कश्यपच्या

रमन राघव 2.0 या चित्रपटाद्वारे केली. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये

हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील अभिनयासाठी शोभिताला

नामांकनही मिळाले होते. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओचा शो ‘मेड इन हेवन’मध्ये मुख्य भूमिका साकारली होती.

Related News

Start typing to see posts you are looking for.