मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात पुन्हा एकदा हालचाली सुरू झाल्या आहेत.
सरकार नव्या जीआरची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे.
अलीकडेच पार पडलेल्या मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत नव्या मसुद्यावर सविस्तर चर्चा झाली.
या मसुद्यात कुणबी प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेत बदल सुचविण्यात आले आहेत.
विशेषतः गावातील समान आडनावाच्या लोकांच्या
अॅफिडेविटसह कुणबी प्रमाणपत्र देण्याची तरतूद करण्याचा
विचार सरकारकडून होत आहे. यामुळे अधिक पात्र व्यक्तींना प्रमाणपत्र मिळू शकण्याची शक्यता आहे.
बैठकीत हैद्राबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटच्या वापराबाबतही चर्चा झाली.
परंतु हैद्राबाद गॅझेटमध्ये फक्त लोकसंख्येचा उल्लेख असून व्यक्तींची ओळख नसल्याने त्यावर पेच निर्माण झाला आहे.
दरम्यान, न्यायालयाच्या सूचनांचाही आढावा घेण्यात आला.
पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी सरकार हालचाल करत असून,
पोलिस महासंचालक मनोजकुमार शर्मा यांनी विके पाटील यांची भेट घेतल्याची माहिती आहे.
मराठा आरक्षणावरील ही हालचाल सरकार पुढील दिशेने जाण्याचे संकेत मानले जात आहेत.
Read also : https://ajinkyabharat.com/jai-ganesh-mandalakadoon-general-knowledge-competition-organized/