उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
या संबंधी पोलीस ठाण्यात एक ई-मेल आला आहे. एकनाथ शिंदे हे थेट लोकांमध्ये मिसळतात.
त्यांच्या सुख, दु:खाशी एकरुप होतात. सध्या त्यांच्याकडे शिवसेनेची जबाबदारी आहे.
Related News
इंदोर मध्ये एमबीए विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करून खून; आरोपीचा शांतपणे दिला गंभीर वक्तव्य
मध्य प्रदेशच्या इंदोर शहरात एका २४ वर्षीय MBA विद्यार्थिनीचा...
Continue reading
हार्दिक पंड्याचा समुद्रकिनाऱ्यावरून ‘राजकन्या’ महिका शर्माला जन्मदिनाची खास शुभेच्छा
भारतीय क्रिकेटपटू Hardik Pandya ने आपल्या गर्लफ्रेंड महिका ...
Continue reading
The 50 : ग्रँड फायनलमध्ये मिस्टर फैसू, शिव ठाकरे, रजत दलाल आणि इमॉर्टल काका टॉप 4 मध्ये; अंतिम फेरी शूट होणार फेब्रुवारी 19 रोजी, प्रसारित होणार 22 मार्च रोजी
रिऐलिटी शो दि 50
Continue reading
गंगाजल प्लास्टिकच्या बाटलीत ठेवल्यामुळे काय होऊ शकते? जाणून घ्या पूजा-संस्कारातील योग्य मार्ग
Continue reading
राज ठाकरेंची एकनाथ शिंदेंशी भेट; बंद दाराआड चर्चा, राजकीय वर्तुळात उधाण
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे.
Continue reading
अजित पवारांच्या अपघातावर रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – “भीती मला नाही, पण कुटुंबाला आहे”
28 जानेवारी रोजी महाराष्ट्रात घडलेल्या दुःखद घटनेने राज्यासह राजकीय वर्तुळात ह...
Continue reading
शेअर बाजार अपडेट: सलग तिसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 283 अंकांनी वर
भारतीय शेअर बाजारात बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. बाजा...
Continue reading
GI-टॅग केलेल्या भारतीय कॉफीला AI Impact Summit 2026 मध्ये जागतिक मान्यता – भारताने कॉफीच्या सुगंधातून जगाला आमंत्रण दिले
भारताच्या वापरातील पारंपरिक आणि खास भौगोलिक गुणांनी समृद्ध...
Continue reading
“Yeh Rishta Kya Kehlata Hai ”मधील नवीन ट्विस्ट — अभिरा, अरमान, मायरा आणि मुक्ति यांच्यातील नवे संकेत आणि उत्कंठावर्धक ड्रामा!
टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय आणि दीर्घकाळ प्रेक्षकांच्य...
Continue reading
द्वारका अपघात: वाहने दुचाकीस्वाराचा जीव घेतल्यानंतर मुलगा व त्याची बहीण चुकीचा आरोप करीत विश्रांती स्थानकात पसार
दिल्लीतल्या द्वारका भागात एका...
Continue reading
“The 50” चा धक्कादायक एपिसोड : निक्की तंबोलीची भावना, वर्चस्वाची लढाई आणि वाइल्डकार्ड रिटर्न
रियालिटी शो “The 50” मध्ये प्रत्येक एपिसोडकडे प्रेक्षक मोठ...
Continue reading
शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे.
गोरेगाव पोलीस ठाण्यात हा धमकीचा ई-मेल आला आहे. पोलिसांकडून ई-मेल पाठणाऱ्यांचा शोध सुरु आहे.
मुंबईतल्या जवळपास 7 ते 8 पोलीस ठाणे आणि इतर विभागात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांना जीवे मारण्याच्या धमकीचा मेल आला आहे. ई-मेलमध्ये एकनाथ शिंदे यांची कार बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.
मुंबई पोलिसाकडून या मेलचा तपास सुरू आहे. मंत्रालय पोलीस, जेजे मार्ग पोलीस ठाण्यात हा धमकीचा मेल आला आहे.
अज्ज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सर्व तपास यंत्रणा सर्तक झाल्या आहेत.
मुंबई गुन्हे शाखेकडून तपास सुरु झाला आहे. मागच्या काही दिवसांपासून निनावी धमकी देण्याचे प्रकार सुरु आहेत.
एकनाथ शिंदे यांच्याच नावाचा उल्लेख का केला? हा ई-मेल कोणी पाठवला? त्यामागचा उद्देश याची चौकशी सुरु आहे.
अज्ज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करुन मुंबई पोलिसांकडून शोध सुरु आहे.
याआधी सुद्धा एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून धमकी मिळाली होती.
मुंबई पोलीस कसून चौकशी करत आहेत.
एकनाथ शिंदे आज कुठे आहेत?
एकनाथ शिंदे आज दिल्लीमध्ये आहेत. महायुतीचे नेते दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या शपथविधीसाठी गेले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी
संवाद साधणार असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे हे थेट लोकांमध्ये मिसळतात. त्यांच्या सुख, दु:खाशी एकरुप होतात.
सध्या त्यांच्याकडे शिवसेनेची जबाबदारी आहे. पक्ष संघटना अधिक बळकट करण्याकडे त्यांनी लक्ष केंद्रीत केलं आहे.
राज्याच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणात ठाकरे गटातून शिवसेनेत इनकमिंग सुरु आहे.
एकनाथ शिंदे यांनी बऱ्यापैकी पक्ष विस्तार केला आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून
राज्यभरातील ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होत आहेत.