मोठी बातमी! अखेर कोंडी फुटली, मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीतून महत्त्वाचा निर्णय

मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीतून मोठी बातमी, नेमका काय

मुंबई – मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यात पुन्हा एकदा मोठं आंदोलन पेटलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठा बांधव

आझाद मैदानावर ठाण मांडून बसले आहेत.

“आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही,”

अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.

उपोषणाचा आज दुसरा दिवस असून वातावरण तापलं

असतानाच सरकारकडून अखेर मोठी हालचाल सुरू झाली आहे.

शिष्टमंडळ भेट घेणार

आज सकाळी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी

मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वाची बैठक झाली.

या बैठकीला चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, उदय सामंत

यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.

दीड तास चाललेल्या चर्चेनंतर अखेर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी

न्यायमूर्ती शिंदे, कोकणचे विभागीय आयुक्त आणि विभागाचे

सचिव हे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार

असल्याची माहिती देण्यात आली.

कोंडी सुटण्याची चिन्हे

आतापर्यंत शिष्टमंडळाकडून भेट न झाल्याने आंदोलनकर्त्यांचा संताप वाढत होता.

मात्र आता प्रत्यक्ष चर्चेला सुरुवात होणार असल्याने

आरक्षणाच्या मुद्द्यावरची कोंडी फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काय म्हणाले विखे पाटील?

“या प्रश्नाची सोडवणूक झाली पाहिजे, हीच सरकारची भूमिका आहे.

आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

अतिशय सकारात्मक वातावरणात आम्ही निर्णय घेतला आहे.

शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करेल.

चर्चेनंतर काही नवे मुद्दे उपस्थित झाल्यास त्यावर पुन्हा चर्चा केली जाईल,”

अशी माहिती उपमुख्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

 आंदोलन आणि सरकारदरम्यान अखेर संवादाची प्रक्रिया सुरू

होणार असल्याने मराठा समाजात आशेची नवी किरणं निर्माण झाली आहेत.

Read also :https://ajinkyabharat.com/banket-nokriichi-muth-sadhi-99-thousand-rupees/