अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या मध्य पूर्व दौऱ्यावर असून, त्यांच्या UAE
(संयुक्त अरब अमीरात) भेटीचे एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
व्हिडीओमध्ये काही महिला पारंपरिक सफेद पोशाखात, लांब केस सोडून,
Related News
वानखेडेवर ‘हिटमॅन’चा अभिमान!
“नरकातला राऊत”… संजय राऊतांच्या पुस्तकावरून भाजपचा घणाघात,
“ऑपरेशन सिंदूर”नंतर भारताची तयारी आणखी आक्रमक
“ट्रंप-असीम डील” : पाकिस्तानवरील अमेरिकेची अचानक वाढलेली मेहरबानी का?
राजस्थानात धक्का बसवणारी घटना:
India vs Pakistan: युद्धविराम वाढल्यानंतर भारतीय सैन्याची प्रतिक्रिया;
फ्राईड राईसमध्ये रबराचे तुकडे;
Gold-Silver Price Today: १६ मे २०२५ रोजी सोन्या-चांदीच्या दरात घसरण;
“बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना एका ‘लोफर’कडे दिली!”
दिल्ली-एनसीआरमध्ये धुळीच्या वादळानंतर वायू गुणवत्ता खालावली;
“मी मुसलमान आहे, खान्ससारखा गद्दार नाही”
Maharashtra Weather Update : वादळ, पावसाचा धोका!
तालबद्ध डोलत ट्रम्प यांचे स्वागत करताना दिसत आहेत. या दृश्यामुळे मुस्लिम जगतातून टीका आणि आश्चर्याची लाट उसळली आहे.
कसार अल वतनमध्ये अनोखे स्वागत:
ट्रम्प यांचे स्वागत अबू धाबीच्या जायद विमानतळावर थाटात झाले.
मात्र जेव्हा ते राष्ट्राध्यक्ष भवन कसार अल वतनमध्ये पोहोचले, तेव्हा त्यांचे स्वागत एका
अनोख्या नृत्यसादृश पद्धतीने करण्यात आले. या स्वागतावेळी महिला कलाकारांनी
पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात लांब केस झटकत ट्रम्प यांना अभिवादन केले.
मुस्लिम परंपरेच्या विरोधात?
या व्हिडीओवर वाद सुरू झाला असून, अनेकांनी असा प्रश्न उपस्थित केला की,
जिथे मुस्लिम महिलांना हिजाब न घालता सार्वजनिक ठिकाणी दिसण्यास बंदी आहे,
तिथे अशा प्रकारे महिलांनी केस सोडून नाचणं — हे दुहेरी मापदंडाचे दर्शन घडवतंय का?
सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया:
एका यूजरने लिहिले, “ज्याचं सामर्थ्य जास्त, त्याचं स्वागतही सगळ्या नियमांचं उल्लंघन करत होतं.”
काहींनी या नृत्याला “भूतिया शैली” असं संबोधलं. अनेकांनी विचारलं की,
हे खरंच पारंपरिक UAE संस्कृतीचं प्रतीक आहे का, की राजकीय कारणांनी परंपरा मोडली गेली?
‘अल-अय्याला’ नृत्यप्रकार:
दावा केला जातो की, ट्रम्प यांचं स्वागत ‘अल-अय्याला’ (Al-Ayyala) या पारंपरिक ओमान-UAE
नृत्यप्रकाराच्या सादरीकरणाने करण्यात आलं. या नृत्यात महिलांचा सहभाग क्वचितच असतो,
पण यावेळी महिलांनी केस झटकण्याची विशिष्ट शैली दाखवली, जी सामान्यतः
संस्कृतीत कमीच पाहायला मिळते. त्यामुळे अनेक धार्मिक कट्टरपंथीय संतप्त झाले आहेत.
ट्रम्प यांचा मध्यपूर्व दौरा:
ट्रम्प 13 ते 16 मे दरम्यान मध्यपूर्वच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी याआधी सौदी अरेबिया आणि कतारला भेट दिली.
मात्र UAE मधील महिलांच्या अनोख्या स्वागतामुळे त्यांचा दौरा वादग्रस्त ठरला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/india-vs-pakistan-ceasefire-indians/