मुस्लिम समाजाच्या वतीने सत्यपाल महाराजांना अकोट भूषण पुरस्कार

श्री सत्यपाल महाराज यांना ‘अकोट भूषण पुरस्कार’

अकोट – स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अकोट शहरातील जामा मस्जिद, शौकत अली चौक येथे मुस्लिम समाजातर्फे “मज्जिद परिचय व सर्व धर्म समभाव” हा

कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात समाज प्रबोधनकार श्री सत्यपाल महाराज यांना ‘अकोट भूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

याचबरोबर तत्कालीन ठाणेदार श्री संतोषजी महल्ले आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री हिम्मत दंदी यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात आले.

कार्यक्रमाला अहिल्यानगर, पारनेर येथील सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. रफिक सय्यद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी तुकाराम महाराज, महात्मा फुले

आणि मोहम्मद पैगंबर यांच्या मानवता आणि धर्मसमभावाच्या शिकवणीवर प्रकाश टाकला.

सत्यपाल महाराजांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर मार्गदर्शन करताना सांगितले –

“आपण सर्वजण एका देवाची लेकरे आहोत, मग भेदाभेद का करतो? रक्तदान किंवा अवयव दान करताना कुणालाही धर्म किंवा जात विचारली जात नाही.

आपल्याला माणुसकी हा धर्म स्वीकारायला हवा.”

या प्रसंगी समाज प्रबोधनकार संदीपपाल महाराज, ऋषिपाल महाराज, डॉ. रामेश्वरजी बर्गट, डॉ. धर्मपाल चिंचोळकर, प्रा. प्रवीण बोंद्रे, प्रबोधनकार

पवन पाल फुकट, श्री बोके यांच्यासह विविध धर्मांचे मान्यवर उपस्थित होते.

हाजी सज्जात हुसेन यांनी उपस्थितांना मज्जिद व नमाज यासंदर्भातील माहिती दिली.

हा अनोखा कार्यक्रम अकोटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

Read also : https://ajinkyabharat.com/kalyan-dombivleet-mansella-motha-push-shekado-officer-shinde-gatat/