मुर्तीजापुर | अधर खान
शासनाच्या निद्रिस्त अवस्थेला धक्का देण्यासाठी, आणि शेतकरी व दिव्यांगांच्या हक्कासाठी प्रहार
जनशक्ती पक्षाने ११ एप्रिलच्या रात्री मुर्तीजापुर येथे जोरदार मशाल मोर्चा काढत सरकारला थेट इशारा दिला —
Related News
उमरा उपकेंद्राची घोर निष्काळजी — मेंढीपालाचा जीव थोडक्यात वाचला,
२४ तासांत जबरी चोरीचा पर्दाफाश; अकोला पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी
सोनं 1 लाख पार करणार? – तज्ज्ञांच्या अंदाजांमधून गुंतवणूकदार संभ्रमात!
जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना ठार मारण्याची धमकी; मुख्यमंत्री कार्यालयाला ईमेल
अहमदाबादमध्ये अपार्टमेंटला आग; धडकी भरवणाऱ्या १८ जणांच्या रेस्क्यूचा थरार
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून राजू शेट्टी आक्रमक
अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांच्या घरासमोर प्रहार जनशक्ती पक्षाचं मशाल आंदोलन
बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी अकोटमध्ये ४०० नागरिकांची स्वाक्षरी
Saif Ali Khan Attack Case: 16 हजार पानी आरोपपत्रात गंभीर खुलासे; करीना कपूरचा पोलिसांना सविस्तर जबाब
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्य शासनाचा उपक्रम – 14 व 15 एप्रिलला मोफत टूर सर्किट
किन्हीराजा : श्री शिवाजी हायस्कूलला दीड लाखांचे आरोप्लॅन्ट भेट – श्रीकृष्ण सोनुने यांचे योगदान
लाखपुरी येथे महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी
“जर सरकार बधत नसेल, तर प्रहारच्या मशालीचा उजेड थेट विधानसभेत पोहोचेल!”
मुर्तीजापुर-बार्शीटाकळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश ‘अप्पा’ पिंपळे यांच्या जनसंपर्क
कार्यालयावर रात्री साडेअकराच्या सुमारास आक्रमक मोर्चा दाखल झाला. हातात पेटलेल्या मशाली,
निळे दुपट्टे, आणि “शेतकऱ्यांचा जयजयकार – सरकारला धक्का देणार!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
प्रहारची ठाम मागणी:
प्रहार तालुका अध्यक्ष अक्षय अनिल वैराळे यांच्या नेतृत्वाखाली सरकारला दिलेल्या निवेदनात प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे:
-
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तात्काळ करावी
-
पेरणी ते कापणीपर्यंतचा खर्च मनरेगामधून द्यावा
-
दिव्यांग बांधवांना दरमहा ₹६००० मानधन मंजूर करावे
‘हे सरकार झोपले आहे!’ – प्रहारचा सवाल
“दररोज सात शेतकरी आत्महत्या करतात आणि सत्ताधाऱ्यांच्या डोळ्याला अजूनही झापडं लागली आहेत!
निवडणुकीआधी ‘शेतकऱ्यांचे पुत्र’ म्हणून मिरवणारे आज गप्प का?” असा थेट सवाल प्रहारने उपस्थित केला.
यावेळी अक्षयभाऊ वैराळे, नारायणभाऊ लोखंडे, संदीप चव्हात, प्रल्हाद मालळकर, पुडलिंग धंदरे,
तुषार लोखंडे, रामेश्वर खुळे, पंकज आंधळे, विठ्ठल घुगे, रणजीत लोखंडे यांसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कडेकोट बंदोबस्तात आंदोलन
मोर्चादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ठाणेदार अजित जाधव
यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गणेश सूर्यवंशी, आशिष शिंदे आणि पवार साहेब यांनी भक्कम पोलीस बंदोबस्त ठेवला.
महात्मा फुले व आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर आंदोलन तीव्र
प्रहारने स्पष्ट केलं की ही लढाई “शेतकऱ्याच्या जिवाची आणि दिव्यांगाच्या हक्काची” असून येत्या
महात्मा फुले जयंती (११ एप्रिल) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (१४ एप्रिल) या काळात आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल.
“हातात मशाल, ओठांवर घोषणा आणि मनात अन्यायाविरुद्धची चीड – प्रहारचं हे आंदोलन सरकारला झोपेतून जागं करणार!”
Read Also :