मुर्तीजापुर मतदार संघात वंचितच्या डॉ. सुगत वाघमारे यांच्या प्रचाराचा झंझावात

अकोला : मुर्तीजापुर मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. सुगत वाघमारे यांचा धडाकेबाज प्रचार सुरू आहे.
यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
शुक्रवारी मूर्तिजापूर-बार्शीटाकळी विधानसभा मतदारसंघातील मुंगशी या गावाला वाघमारे यांच्यासह वंचितच्या पदाधिकारी,
कार्यकर्त्यांनी भेट दिली. डॉ. वाघमारे यांचा ताफा पाहून विरोधकांच्या उरात धडकी भरली.
प्रस्थापित राजकीय नेत्यांनी गटातटांच्या राजकारणात अडकून केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी तालुक्यातील महत्त्वाचे प्रश्न आणि विकास कामे रोखून धरली आहेत.
आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे अडथळे दूर करत, तालुक्यातील समस्यांचे समाधान करून  तालुक्याचे उज्ज्वल भविष्य घडवू,
असा दृढ संकल्प यावेळी डॉ. सुगत वाघमारे यांनी व्यक्त केला. जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत,
नव्या विकासाच्या दिशेने पाऊल टाकणार असल्याचे त्यांनी सांगितले.
येत्या 20 नोव्हेंबर रोजी अनुक्रमांक “८” समोरील “गॅस सिलेंडर” या चिन्हा समोरील  बटन दाबून डॉ. सुगत वाघमारे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.