मुंडगाव – अकोट तालुक्यातील संत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
मुंडगाव येथील सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखेचे दप्तरी केशवराव नामदेवराव लहाने
यांचा सेवानिवृत्ती निमित्त निरोप समारंभ दि. ३१ ऑगस्ट रोजी लहाने मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वप्नील इंगळे तर प्रमुख अतिथी म्हणून दिनेश पांडे,
प्रकाश बेलवरकर, निळकंठ पाचकोर, अमित चौधरी व सरपंच तुषार पाचकोर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सेवानिवृत्त दप्तरी केशवराव लहाने व
त्यांच्या पत्नी पुष्पाताई लहाने यांचा शाल-श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी भाषण करताना निळकंठ पाचकोर गुरुजी म्हणाले,
“केशवराव लहाने यांनी आपल्या कारकीर्दीत ग्राहक, कर्मचारी व अधिकारी
यांना सन्मानाने वागणूक देत सर्वांना सोबत घेऊन गाडा पुढे हाकला.
त्यांच्यासारखी माणसे दुर्मीळ आहेत.”
अध्यक्षीय भाषणात स्वप्नील इंगळे यांनी लहाने यांचे व्यक्तिमत्व व
कार्यपद्धतीचे कौतुक करताना सांगितले की,
“बँकेतील कामकाज करताना कोणताही वाद न होऊ देता सर्वांचे प्रश्न सोडवणे ही लहाने यांची खासियत होती.”
समारंभात अंजली लहाने, दिनेश पांडे, अमित चौधरी, डॉ. सुभाष गणगणे,
सांगळुदकर आदींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुरलीधर इंगळे यांनी केले.
अंजली लहाने व रुपाली भेले यांनी संचालन केले तर आभार प्रदर्शन प्रविण पागृत यांनी केले.
गावातील असंख्य महिला-पुरुषांच्या उपस्थितीत झालेल्या या समारंभाचे
आयोजन चेतन लहाने व त्यांच्या नातेवाईकांसह बँक कर्मचाऱ्यांनी केले.
Read also : https://ajinkyabharat.com/amol-patankar-yanka-hospital/