मुंडगावच्या जिल्हा परिषद उर्दू शाळेत दान म्हणून पाण्याची टाकी; विद्यार्थ्यांना दिलासा

मुंडगावच्या जिल्हा परिषद उर्दू शाळेत दान म्हणून पाण्याची टाकी; विद्यार्थ्यांना दिलासा

मुंडगाव प्रतिनिधी..

अकोट तालुक्यातील संत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंडगाव येथील

बालेखान अब्दुलाखान यांच्या स्मरणार्थ येथील सामाजिक कार्यकर्त्या अजिज अहेमद यांनी मुंडगाव येथील

जिल्हा परिषद उर्दु प्राथ शाळेच्या आवारात विद्यार्थींना पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी दान म्हणून १ हजार लिटर

पाणी साटेल अशी टाकी बांधून दिली व येथील लहान लहान विद्यार्थ्यांना जेणेकरुन पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार नाही

विशेष म्हणजे मुंडगाव येथे पाणी हे १५दिवसाच्या नंतरच मिळते व जेव्हा पाणी पुरवठा योजनेचे पाणी येते .

त्यावेळी शाळा बंद असते व शाळेत पाणी नसल्याने विद्यार्थी पाण्यासाठी वणवण भटकत होते हि विद्यार्थ्यांची समस्या पाहुन येथील सामाजिक

कार्यकर्त्या अजिज अहेमद यांनी आपल्या आजोबांच्या स्मरणार्थ स्वखर्चाने पाण्याची टाकी बांधून दिली.

व विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करून दिली या साठी येथील शिक्षक ऐजाजअली,

मुख्याध्यापक महंमद शफीक,अबरार शाह,मंहमद इजाज, अफजल शाह,जाकीर हुसेन, आसिफ खान, नुसरत अली,

यांचे सुध्दा मार्गदर्शन लाभले तसेच येथील प्रभारी सरपंच तुषार पाचकोर, सदस्यपती इम्रान खान, सदस्य नितीन गाडगे,

सुभाष इंगळे,सह असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत हे पाण्याच्या टाकी बांधल्याने विद्यार्थ्यांची समस्या कायमची सुटली आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/akot-talukya-panand-rastyanchi-durasha/