मुंडगाव येथे सर्पदंशाने महिलेचा मृत्यू!

मुंडगाव येथे सर्पदंशाने महिलेचा मृत्यू!

मुंडगाव प्रतिनिधी राजकुमार वानखडे..

तालुक्यातील मुंडगाव

येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन बाळुभाऊ सरकटे यांची आत्या बेबीनंदा मधुकर वानखडे वय ५५ वर्ष यांना त्यांच्या राहत्या घरात

दि.२९ जुलैच्या मध्यरात्री मन्यार जातीच्या विषारी सापाने दंश केला होता.त्याना सर्व प्रथम मुंडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

पंरतु या ठिकाणी सदर महिलेवर कोणत्याही प्रकारचा उपचार झाला नसल्याने व या महिलेची हालत गंभीर

असल्याने त्यांना अकोला येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असता त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात तात्काळ उपचार सुरू करण्यात आले.

पंरतु ते दि.३१जुलै रोजी मृत्यू पावल्याची सर्वत्र चर्चा पसरली होती व सदर मुंडगाव मध्ये पाहुणे सुद्धा दाखल झाले होते.

पंरतु नंतर समजले की सदर महिला अजुन जिवंत आहे.व काळाने घाला घातला आणी दि १ ऑगस्ट च्या रात्री २च्या सुमारास या महिलेला

डॉक्टरांनी मृत घोषित केले व त्याची अंत्ययात्रा मुंडगाव येथे पार पडली. विशेष म्हणजे या महिलेचे पती हे अगोदरच मरण पावले आहेत

तर दोन मुले असुन ते दोन्ही मुले मानसिक आजाराने ग्रस्त आहेत.

सदर महिला शेतमजुरी करुन आपल्या परीवाराचा उदरनिर्वाह चालवत होती परंतु हि महिला गेल्याने या मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या

मुलांवर उपासमारीची वेळ तर येणार नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर महिलेची मुलगी सुध्दा मानसिक आजाराने ग्रस्त आहे.

सदर महिलेला वाचविण्यासाठी येथील त्रिमूर्ती प्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांनी खुप परीश्रम घेतले व शेवटी या महिलेने जगाचा निरोप घेतला.

तेव्हा शासनाने या कुटुंबांतील सदस्यांच्या देखभालीसाठी मदत करावी असे सुजाण नागरिकांचे म्हणणे आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/akola-district-feminine-sickle-tender-scam/