मुंबईच्या दिशेने मनोज जरांगे, हजारो गाड्यांचा ताफा सोबत

हजारो

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांच्या आंदोलनास

कोर्टाने मनाई केली असली तरी ते आधी सांगितल्याप्रमाणे अंतरवली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

जरांगे यांच्यासोबत हजारो गाड्यांचा ताफा असून एम्ब्युलन्ससह ही वाहने मुंबईकडे निघाली आहेत.

राज्य सरकारने शिंदे समितीला आणखी सहा महिन्यांची मुदत दिलेली आहे.

मात्र, गणपतीच्या दिवसात मुंबईत प्रचंड गर्दी असल्याने आंदोलन तूर्त मागे घ्यावे,

अशी विनंती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी केली होती.

तरीही जरांगे यांनी “सरकारला दोन वर्षे दिली, आणखी किती वेळ देणार?”

अशी ताठर भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता जरांगे यांना

मुंबईत प्रवेश करू दिला जातो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read also :https://ajinkyabharat.com/punda-yehehe-pu-manpuri-maharaj-yanchaya-punyathinimittha-saptahache-organizing/