मुंबई : आयपीएलच्या प्ले ऑफची शर्यत आता चांगलीच रंगतदार झाली आहे. त्यामध्येच मुंबई इंडियन्सचा सामना आता केकेआरविरुद्ध होणार आहे. पण केकेआरविरुद्ध जर मुंबई इंडियन्सचा संघ पराभूत झाला तर त्यांचे या आयपीएलमधील आव्हान संपुष्टात येणार आहे, याचे समीकरण आता समोर आले आहे.
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत १० सामने खेळले आहेत. या १० सामन्यांमध्ये तब्बल सात सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाला सात पराभव पत्करावे लागले आहेत. पण या १० सामन्यांत मुंबई इंडियन्सला तीन विजय फक्त मिळवता आले आहेत. या तीन विजयांसह मुंबई इंडियन्सच्या संघाच्या खात्यामध्ये सहा गुण आहेत.
मुंबईचा संघ हा या सहा गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानावर आहे. पण मुंबईचा संघ नवव्या स्थानावर असला तरी त्यांचे आव्हान अजूनही कायम आहे. पण केकेआरच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये पोहोचू शकतो का, याचे समीकरण आता स्पष्ट झाले आहे.
Related News
‘मला चटके देताना एवढंच म्हणायचे…’, गरम सळईचे चटके दिलेल्या तरूणानं सांगितली धक्कादायक आपबीती
मुलीच्या छेडछाडीप्रकरणी भाजपचा माजी नगरसेवक आरोपी, सध्या शिंदे गटात!”
शिंदे सरकारच्या योजनेनं गोची; ‘लाडक्या भावां’मुळे भलतीच अडचण; कॅबिनेटमध्ये वादळी चर्चा
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीची तिरडी; पुण्यात रणरागिणींचं अनोखं आंदोलन!
मोठी बातमी! मध्य रेल्वेवर दोन दिवस विशेष ब्लॉक; CSMT वरुन सुटणाऱ्या ५९ लोकल, ‘या’ मेल-एक्स्प्रेस रद्द, पाहा वेळापत्रक
गणपत गायकवाड यांच्या मुलाचं नाव चार्जशीटमधून वगळलं, ठोस पुरावे नाहीत, पोलिसांचं स्पष्टीकरण
संतोष देशमुख हत्या प्रकरणात चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे विधान, म्हणाले, आमच्या सरकारने ज्या बाबी…
बुडत्याचा पाय खोलात! शेअर मार्केटमध्ये काही तरी मोठं घडणार; Nifty कोसळण्याच्या उंबरठ्यावर
मुंबई तापली, पाणीसाठा कमी! महापालिकेचं मुंबईकरांना महत्त्वाचं आवाहन
“रेशनकार्डधारकांसाठी मोठी बातमी: रेशनसोबत मिळणार खास गिफ्ट!”
भारताच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या संघावर आयसीसीची कारवाई, समोर आलं आता नवीन प्रकरण…
पीकविमा देऊन सरकार उपकार करते काय? नाना पटोलेंचा सवाल; कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
मुंबई इंडियन्सचे अजून या आयपीएलमध्ये चार सामने बाकी आहेत. या चार सामन्यांमध्ये मुंबईने तर सर्व लढती जिंकल्या तर त्यांना अजून आठ गुण कमावता येऊ शकतात आणि त्यांचे एकूण १४ गुण होऊ शकतात. आयपीएलचे प्ले ऑफ गाठायचे असेल तर त्यासाठी एक मॅजिक फिगर असते.
जेव्हा आठ संघ खेळायचे तेव्हा १२ गुण ही मॅजिक फिगर होती. पण आता आयपीएलमध्ये १० संघ असतात, त्यामुळे या आयपीएलचा मॅजिक फिगर हा १४ गुण असणार आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सच्या संघाने सर्वच्या सर्व सामने जिंकले तरच त्यांना आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची संधी असेल.
पण जर केकेआरचा सामना मुंबई इंडियन्सने गमावला तर त्यांचे आव्हान संपुष्टात येणार असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मुंबईसाठी केकेआरचा सामना करो या मरो असाच असणार आहे.
मुंबई इंडियन्सच्या संघाची हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत चांगली कामगिरी झालेली नाही. त्यामुळेच ते आयपीएलच्या पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानावर आहेत. त्यामुळे आता केकेआरच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ जिंकतो की हरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
कारण मुंबईच्या संघाने हा सामना जिंकता तर त्यांना प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची अजून एक संधी असू शकते. पण जर त्यांचा पराभव झाला तर ते आयपीएलमधून आऊट होणार आहेत.