मुंबईतून आणखी एका शहरासाठी धावणार वंदे भारत, कसा असेल मार्ग, जाणून घ्या

मुंबईतून आणखी एका शहरासाठी धावणार वंदे भारत, कसा असेल मार्ग, जाणून घ्या

Vande Bharat Route: मुंबईकरांसाठी आणखी एक वंदे भारत मिळणार आहे. जाणून घ्या कोणत्या मार्गावर धावणार

Vande Bharat Route: भारतीय रेल्वेतून लाखो लोक प्रवास करतात.

नागरिकांचा प्रवास आणखी सोप्पा होण्यासाठी रेल्वेकडून अनेक उपाययोजना हाती घेण्यात आली आहेत.

Related News

रेल्वेने जेव्हापासून सेमी हाय स्पीड ट्रेन वंदे भारत सुरू केली आहे तेव्हापासून नागरिकांचा प्रवास सुकर झाला आहे.

रेल्वेकडून आणखी एका मार्गावर वंदे भारत धावणार आहे.

नवीन मार्गावर मुंबई- गोवा आणि मंगळुरू-गोवा हे दोन्ही मार्ग एक करुन थेट मुंबई आणि मंगळुरूला जोडण्यात येईल.

झी न्यूजच्या माहितीनुसार, या अपग्रेडमुळं प्रवासाचा वेळ 12 तासांत पूर्ण होणार आहे.

सध्या मुंबई-गोवा वंदे भारत सकाळी 5.25 वाजता रवाना होते आणि दुपारी 1.10 वाजता गोवा पोहोचते.

मात्र नवीन प्लाननुसार, मंगळुरूपर्यंत थेट जाणार आहे. मंगळुरूला 6 वाजता वंदे भारत ट्रेन पोहोचणार आहे.

याचप्रमाणे मंगळुरू-गोवा वंदे भारत सकाळी 8.30 वाजता रवाना

होईल आणि दुपारी 1.10 वाजता गोव्याला पोहोचेल. तर, रात्री 9 वाजता मुंबईत पोहोचेल.

Related News