शिंदे सरकारकडून मुंबईत टोलमाफीची घोषणा

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आता राज्य सरकारने एक

मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकारकडून टोलमाफीची घोषणा

करण्यात आली आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवर

Related News

संपूर्णपणे ही टोल माफी दिली जाणार आहे. आज रात्री बारा

वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

हा नियम केवळ हलक्या मोटर वाहनांना लागू असणार आहे.

आता राज्य सरकारच्या या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे

यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत टोलमाफीचा निर्णय

जाहीर होताच राज ठाकरे यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली

आहे. यात त्यांनी मनसैनिकांचे अभिनंदन केले आहे. “आमच्या

आंदोलनाला बऱ्यापैकी यश आलं ही आनंदाची बाब. यासाठी

राज्य सरकारचं मी अभिनंदन करेन, पण फक्त हा निवडणुकीपुरता

घेतलेला निर्णय नाही, याची खात्री सरकारने जनतेला द्यायला

हवी”, असा सल्लाही राज ठाकरेंनी दिला.

दरम्यान मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर टोल माफी

दिली जाणार आहे. हा नियम केवळ हलक्या मोटर वाहनांना लागू

असणार आहे. मुंबईतील वाशी, दहिसर, ऐरोली, आनंदनगर आणि

एलबीएस मुलूंड या टोल नाक्यांवर टोल माफी देण्यात येणार आहे.

मात्र अटल सेतूसाठी हा नियम लागू केला जाणार नाही. नुकत्याच

झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/major-decision-regarding-dharavi-redevelopment-in-cabinet-meeting/

Related News