मुंबई पोलीस निवडणुकीत उमंग पॅनलचा दणदणीत विजय!

मुंबई पोलीस निवडणुकीत उमंग पॅनलचा दणदणीत विजय!

बृहन्मुंबई पोलीस पगारदार पतसंस्थेच्या निवडणुकीत उमंग पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.

तुम्ही आतापर्यंत सर्वसामान्य ते निवृत्त अधिकाऱ्यांना निवडणूक  लढवल्याचे ऐकले

असेल पण मुंबई पोलिसांनीही निवडणूक लढवल्याचे तुम्ही ऐकले आहे का?

Related News

मुंबई पोलीसही निवडणूक लढतात. पण, स्वतःच्या पगारदार पतसंस्थेसाठी.

गेल्या 100 वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या बृहन्मुंबई पोलीस पगारदार पतसंस्थेच्या निवडणुकीत मुंबई पोलिसांचे विविध पॅनेल उभे होते.

त्यात दादा सलगर यांच्या पॅनलने बाजी मारली. उमंग पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.

या पतसंस्थेतील 28,060 सभासद निवडणुकीकरता पात्र होते.

त्यापैकी 10,949 मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

मुंबई पोलिसांच्या बृहन्मुंबई पोलीस कर्मचारी पगारदार सहकारी पतसंस्था मर्यादित,

मुंबई या पतसंस्थेची 3 ऑगस्ट 1920 रोजी स्थापना करण्यात आली होती. मुंबईचे विद्यमान पोलीस

आयुक्त या पतसंस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. मात्र सदर पतसंस्थेतील इतर 13

सदस्यांच्या पदासाठी दर ५ वर्षांनी निवडणूक घेतली जाते. मात्र, कोरोना काळात निवडणूक घेणे शक्य

नसल्याने तत्कालीन उमंग पॅनलला पुढे मुदतवाढ देण्यात आली होती. ती मुदत संपल्याने पुन्हा निवडणूक पार पडली.

पाच पॅनल निवडणुकीसाठी होते रिंगणात

या पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी एकूण 32,000 सदस्यांपैकी 28,060 सदस्य मतदानास पात्र होते.

प्रत्येकी 13 उमेदवार असलेले 5 पॅनल एकमेकांविरुद्ध पूर्ण ताकदीनिशी उभे राहिले होते. उमंग, संजीवनी,

परिवर्तन, दक्षता आणि समर्थ असे पाच पॅनल निवडणुकीच्या रिंगणात होते. मुंबईतील सर्व 99 पोलीस ठाणे,

विशेष शाखा कार्यालये, पोलीस आयुक्त कार्यालयातील विविध विभाग, पोलीस महासंचालक कार्यालय

तसेच इतर कार्यालये पात्र उमेदवारांनी पिंजून काढली होती. 10,949 मतदारांनी निवडणुकीत सक्रिय सहभाग नोंदवला.

त्यामुळे या निवडणुकीत नेमकी कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

उमंग पॅनलने रचला इतिहास
या निवडणुकीत एकूण 73 उमेदवार निवडणूक लढवत होते. त्यापैकी उमंग पॅनलचे 13 पैकी 13

उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आले आहेत. उमंग पॅनलने सलग दुसर्‍यांदा विजय मिळवून इतिहास रचला आहे.

उमंग पॅनलचे दादा सलगर यांनी सर्व मतदारांचे आभार मानले आहेत.

Click here for more updates : https://ajinkyabharat.com/australian-killer-whales-destroyed-karanyacha-decision/

Related News