Mumbai Indians : IPL मध्ये खेळता यावं, यासाठी बुमराह एका आठवड्यात दुसऱ्यांदा पोहोचला या खास ठिकाणी

Mumbai Indians : IPL मध्ये खेळता यावं, यासाठी बुमराह एका आठवड्यात दुसऱ्यांदा पोहोचला या खास ठिकाणी

Mumbai Indians : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शेवटचा कसोटी सामना खेळताना बुमराहला दुखापत झाली होती.

यंदाच्या IPL 2025 मध्ये बुमराहच्या खेळण्याबद्दल सस्पेन्स आहे. आयपीएलमध्ये खेळता यावं, यासाठी बुमराह एका आठवड्यात दुसऱ्यांदा या खास ठिकाणी पोहोचला.

टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह IPL 2025 मध्ये खेळणार की नाही?

Related News

या बद्दल सस्पेन्स कायम आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शेवटचा कसोटी सामना खेळताना बुमराहला दुखापत झाली होती.

त्यानंतर तो एकही सामना खेळलेला नाही. बुमराहला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी नॅशनल क्रिकेट अकादमीमधून सर्टिफिकेट घ्यावं लागेल.

त्यानंतरच तो मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये दाखल होऊ शकतो. पण अजूनपर्यंत त्याला फिटनेस सर्टिफिकेट मिळालेलं नाही. जसप्रीत बुमराह आयपीएल 2025 आधी पुन्हा एकदा नॅशनल क्रिकेट अकादमीत गेलाय.

जसप्रीत बुमराह आयपीएल 2025 च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळणार नाहीय.

पण लवकरच तो मुंबईच्या टीममध्ये दाखल होईल अशी अपेक्षा आहे. जसप्रीत बुमराहला फिटनेसट सर्टिफिकेट जरी मिळालं,

तरी त्याला मॅचसाठी फिट व्हायला जवळपास एक आठवडा लागेल. त्यामुळे तो कमीत कमी मुंबईच्या सुरुवातीच्या दोन ते तीन सामन्यांना मुकू शकतो.

बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आधी सुद्धा फिटनेस सर्टिफिकेटसाठी NCA मध्ये गेला होता.

पण तो फिट नसल्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीममध्ये संधी मिळू शकली नव्हती.

बुमराहला किती कोटी मोजून रिटेन केलय?

बुमराह मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा खेळाडू आहे. आयपीएल 2025 आधी त्याला 18 कोटी रुपये मोजून रिटेन करण्यात आलय.

तो मुंबई इंडियन्सच आशास्थान आहे. तो लवकरच फिट होईल अशी मुंबईच्या चाहत्यांना अपेक्षा आहे.

मुंबई इंडियन्सचे हेड कोच माहेला जयवर्धने अलीकडेच प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणाले की, “तो दुखापतीमधून रिकव्हर होतोय.

पुढे काय होतं, त्याची प्रतिक्षा आहे. सध्या सर्वकाही व्यवस्थित आहे. पण आम्हाला दररोज आढावा घ्यावा लागेल.

बुमराह टीममध्ये नसणं एक आव्हान आहे. तो जगातील सर्वश्रेष्ठ गोलंदाजांपैकी एक आहे.

अनेक वर्षांपासून तो आमचा उत्तम खेळाडू आहे”

Related News