मुंबई – शुक्रवार, 12 सप्टेंबर 2025 : मुंबई हायकोर्टाला धक्कादायक बॉम्ब स्फोटाची धमकी मिळाल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. २ वाजेच्या सुमारास हायकोर्टातील रजिस्टर ऑफिसवरून मेलद्वारे धमकी मिळाली असून, धमकीमध्ये बॉम्ब स्फोटासाठी शुक्रवार पवित्र असल्याचा उल्लेख केला गेला आहे. पाकिस्तान आणि तामिळनाडू यांची मिलीभगत असल्याचेही ह्या धमकीत नमूद करण्यात आले आहे.
धमकीत काय म्हटले?
‘बॉम्ब स्फोटासाठी शुक्रवार पवित्र… पाकिस्तान आणि तामिळनाडू यांची मिलीभगत… न्यायाधीशांच्या रूममध्ये व कोर्ट परिसरात तीन बॉम्ब ठेवले आहेत… दुपारी २ वाजेपर्यंत इमारत खाली करा,’ असे मेलमध्ये सांगण्यात आले आहे.
तत्काळ कारवाई सुरू…
ही धक्कादायक माहिती मिळताच मुंबई हायकोर्टातील सर्व न्यायाधीश, वकील व कोर्ट स्टाफ यांना बाहेर काढण्यात आले. बॉम्ब स्कॉड पथक आणि पोलीसांचे तातडीचे पथक हायकोर्ट परिसरात दाखल झाले असून संपूर्ण इमारत तपासण्यासाठी खाली करण्यात आली आहे. तसेच बॉम्बशोधक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व परिसर सखोलपणे तपासला जात आहे.
दिल्ली हायकोर्टालाही धमकी…
मुंबई हायकोर्टसोबतच दिल्ली हायकोर्टालाही अशाच प्रकारची धमकी मिळाल्याची माहिती आहे. त्यामुळे दिल्ली हायकोर्टही तातडीने रिकामा करण्यात आला असून सुरक्षा उपायांचे विशेष आवाहन करण्यात आले आहे.
स्पेशल सेलच्या कारवाईचा संदर्भ…
अलीकडेच स्पेशल सेलने देशभरातून पाच संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटकेही जप्त झाली आहेत. मुंबई पोलिस आता तपास करत आहेत की, मिळालेल्या धमकीचा व अटक केलेल्या दहशतवाद्यांचा काही संबंध आहे का, याचा शोध घेत आहेत.
सुरक्षेची काळजी वाढली…
मुंबई शहराच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नागरिकांचे हृदय धडधडण्यास लावणारी ही धमकी, तसेच भारताच्या विविध स्थानांवर वाढती दहशतवादाची सक्रियता, गंभीर चिंता निर्माण करत आहे.पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले असून, सध्या परिस्थितीवर कडक नजर ठेवली गेली आहे. पुढील तपास अहवालावरूनच पुढील कारवाई ठरवली जाणार आहे.
read also :https://ajinkyabharat.com/manoj-zargrench-tenisala-dhoka/