गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत.
दरवर्षी गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात डिजे आणि लेझर लाईटचा
वापर केला जातो. यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येते.
Related News
स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा समरी अहवाल उघड!
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
याबाबत अखिल भारतीय ग्राहक पंचायतकडून मुंबई उच्च न्यायालयात
एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
अनेकदा सण उत्सवामध्ये लेझर बीम आणि डीजेच्या वापर सर्रास केला जातो.
यामुळे अनेकांची दृष्टी आणि श्रवण क्षमतेवर परिणाम झाला आहे.
काहींना कायमची दृष्टी गमावली आहे. त्यामुळे लेझर बीम आणि डिजेच्या वापराबाबत
योग्य आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.
याचिकेची गंभीर दखल मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती
अमित बोरकर यांनी घेतली. सण उत्सवादरम्यान ध्वनी प्रदूषणाच्या
नियमावलींचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होते.
त्यामुळे याचिकाकर्त्यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्य प्रदूषण
नियंत्रण मंडळाच्या निदर्शनास ही बाब आणून द्यावी किंवा
त्याबाबत माहितीचा समावेश असलेले निवेदन सादर करावे, असे आदेश
न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिले आहे. तसेच दोन्ही प्रदूषण नियंत्रण मंडळांनी
त्या अनुषंगाने योग्य ती कारवाई करावी आणि उपाययोजना कराव्यात,
असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/golden-sandhi-for-10th-pass-candidates-recruited-by-the-supreme-court/