मुंबई बेस्ट निवडणूक : मतदानाला अवघे 24 तास शिल्लक, 21 संचालकांना EOW कडून चौकशीची नोटीस; निवडणुकीत मोठा ट्विस्ट
मुंबई – मुंबईतील ‘दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी’**च्या निवडणुकीला अवघे 24 तास उरले असतानाच निवडणुकीला नवे वळण मिळाले आहे.
या पतसंस्थेतील 21 संचालकांना आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेच्या कामगार सेनेने एकत्र येत ‘उत्कर्ष पॅनल’ स्थापन केले असून, त्याविरोधात भाजपकडून ‘सहकार समृद्ध पॅनल’ मैदानात उतरले आहे.
या पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी ठाकरे गटाच्या पॅनलविरोधात जोरदार मोहीम राबवली आहे.
भ्रष्टाचाराचे आरोप
भाजप आमदार प्रसाद लाड यांनी बेस्ट पतसंस्थेत तब्बल २४ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.
“बंगले खरेदी, कार्यालय खरेदी आणि डिपॉझिट किकबॅक या प्रकरणांमुळे मोठा भ्रष्टाचार उघड झाला आहे.
यात सर्व संचालकांची चौकशी होणारच आहे. त्यातच पतसंस्थेचे अध्यक्ष उमेश सारंग आणि बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत
यांची चौकशी व्हावी, ही माझी मागणी आहे,” असे लाड यांनी म्हटले आहे.
ठाकरे गट विरुद्ध भाजप
२१ जागांपैकी ठाकरे गट १९ जागांवर तर मनसे २ जागांवर निवडणूक लढवत आहे.
ठाकरे बंधूंच्या या युतीविरोधात भाजपचा ‘सहकार समृद्ध पॅनल’ थेट लढतीला सज्ज आहे.
उद्या म्हणजेच १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- READ ALSO:https://ajinkyabharat.com/mahatma-gandhi-vidyalaya-flag-hoisting/