मुंबईत आंदोलकांचा हट्ट, व्हायरल होतायत व्हिडीओ

व्हायरल

मुंबई – मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या

नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानात सुरु असलेल्या आंदोलनाने जोर धरला आहे.

राज्यभरातून आलेल्या मोठ्या संख्येने आंदोलकांनी मैदानात तळ ठोकला असून,

आज चौथ्या दिवशीही हे आंदोलन सुरुच आहे.

आंदोलकांचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

काही आंदोलक रस्त्यावरच आंघोळ करताना, तर काही रेल्वे स्थानकात

जल्लोष करताना दिसत आहेत. सीएसएमटी स्थानक

परिसरात मोठी गर्दी जमल्याने वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

आझाद मैदान, मरीन ड्राईव्ह,

पायधुनी व वडाळा येथे वाढीव पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

जरी मनोज जरांगे यांनी शांततेचे आवाहन केले असले तरी आंदोलकांचा हट्ट सुरूच आहे.

काही ठिकाणी आंदोलकांनी बेस्ट बस अडवल्या तर

काहींनी पोलिस बॅरिकेड्सवर चढत आंदोलन तीव्र केले.

“आता हटायचंच नाही” असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.

Read also :https://ajinkyabharat.com/muthi-baatmi-amit-thackeray-yanchi-maratha-andolkana-humi-mumbaiat-kuthehi-tyana-ekte-vatu-danar-naahi/