अकोला : अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वर आज (22 ऑगस्ट) सकाळी भीषण अपघाताची घटना घडली.
मुंबई-वापीहून रायपूरकडे जनरेटर घेऊन जाणारा कंटेनर ट्रक (क्र. CG 04 LR 2292) भरधाव वेगात जात असताना अचानक टायर फुटल्याने तो
अनियंत्रित होऊन पेट्रोल पंपाजवळ लोखंडी कटघरे फोडत रस्त्याच्या कडेला पलटी झाला.
अपघात इतका भीषण होता की मोठा अनर्थ घडू शकला असता, परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.घटनेनंतर काही काळ महामार्गावर भीतीचे वातावरण निर्माण झाले.
स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले;
परंतु स्थानिक पोलीस व महामार्ग प्रशासनाची मदत वेळेवर पोहोचली नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
वाहतुकीवर फारसा परिणाम झाला नसला तरी महामार्ग सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर चर्चा सुरू झाली आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/shri-shivaji-vidyalaya-mop-yehet-vidyartininna-cycle-watp/